वीरेंद्र तावडे दाभोलकर हत्येचा सूत्रधार, आरोपपत्रात सीबीआयचा दावा
एबीपी माझा वेब टीम | 07 Sep 2016 07:50 AM (IST)
मुंबई : डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्येप्रकरणी सीबीआयने मुंबई उच्च न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रा सनातन संस्थेचा सदस्य डॉ. वीरेंद्र तावडे हा दाभोलकर हत्येचा सूत्रधार असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. याशिवाय सारंग अकोलकर आणि विनय पवार हे नरेंद्र दाभोलकरांचे मारेकरी असल्याचं आरोपपत्रात नमूद केलं आहे. फोटो : दाभोलकर हत्या प्रकरण: कोण आहेत सारंग अकोलकर आणि वीरेंद्र तावडे? सारंग अकोलकर आणि विनय पवार हे दोघीही फरार आहे. तर सारंग अकोलकर हा गोवा स्फोटाचा फरार आरोपी आहे. तर डॉ. वीरेंद्र तावडे हा सध्या सीबीआय कोठडीत आहे. अंधश्रद्धेविरोधात आयुष्यभर लढा देणारे, पुरोगामी विचारवंत डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची 20 ऑगस्ट 2013 रोजी पुण्यात हत्या झाली होती. पुण्यातील ओंकारेश्वर पुलावर नरेंद्र दाभोळकरांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. संबंधित बातम्या: