Pune Ganpati Visarjan 2022 : पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणुकीत एकनाथ शिंदे (Eknath shinde) आणि  उद्वव ठाकरे (uddhav thackeray)समर्थक आमने-सामने आले होते. मिरणुकीदरम्यान (Pune Ganesh Festival 2022) त्या दोन्ही मंडळांनी संयम राखला त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. त्यामुळे मिरवणुकीला गालबोट लागलं नाही.


पुण्यातील टिळक रोडवर दोन गणपती मंडळ एका वेळी आमने-सामने आहे. एक  शिवराज गणेश मंडळ हे शिवसेनेचे माजी शहराध्यक्ष आणि सध्या शिंदे गटात दाखल झालेले अजय भोसले (Ajay Bhosale) यांचे होते. तर दुसरे मंडळ हे कासेवाडी भागातील स्थानिक शिवसैनिकांचे (Shivsena) होते. एकाच वेळी दोन्ही मंडळातील तरुणांनी गाण्यावर ठेका धरला होता. एक मंडळ उद्वव ठाकरे यांचा फोटो हातात घेऊन ताल धरत होतं तर त्यापेक्षा मोठ्या आवाजात दुसरं मंडळं एकनाथ शिंदे यांचा फोटो हातात घेऊन ताल धरत होता. यावेळी दोन्ही मंडळांमध्ये चिथावण्याचा प्रयत्न करत होते. 


दोन्ही गटांनी फोटो दाखवत धरला ताल 
यंदा दोन वर्षांनी गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.प्रत्येक गणेश मंडळांनी आपली 10 दिवस वेगवेगळे उपक्रम राबवले. विसर्जन मिरवणूकीच्या वेळी देखील आपली वेगळी छाप पाडण्याचा प्रयत्न अनेक मंडळांनी केला. वेगवेळ्या थीम ठरवून रथ सजवले होते. त्याचप्रमाणे काही मंडळांनी राजकीय वातावरणावर आधारित देखावे सादर केले होते. यातच या दोन्ही मंडळांनी देखील आपल्या नेत्यांचे फोटो हातात घेत मिरवणुकीत सहभागी झाले होते. एक मंडळ शिंदे समर्थक होतं तर दुसरं मंडळ उद्धव ठाकरे समर्थक होतं. दोन्ही मंडळांनी काहीही अनुचित प्रकार न घडू देता. एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरेंचा फोटो हातात घेत एकमेंकांना चिथावत डिजेवर थिरकले.


मिरवणूक सुरु असताना पोलिसांनी कोणत्याच मंडळांच्या उत्साहात हस्तक्षेप केला नव्हता. सगळ्या मंडळांना उत्साह साजरा करण्याची अनुमती देण्यात आली होती. मात्र मिरवणुकांसाठी दुसरा दिवस उजाडल्यामुळे पोलिसांनीही जलद गतीनं मिरवणुका पुढे नेण्याचे आदेश दिले आहेत. कालपासून शहरातील महत्वाचे रस्ते मिवरणुकीसाठी बंद करण्यात आले होते. त्यात टिळक रस्त्याचाही समावेश होता. 30 तासांच्या सलग मिरवणुकीनंतर अखेर पुण्यातील शेवटच्या गणपतीचं विसर्जन झालं. गेले तीस तास सलग गणपती विसर्जन मिरवणुक सुरु होती. यंदा पुणेकरांनी विसर्जन मिरवणुकीचा चांगलाच आनंद घेतला. मात्र या सगळ्यामुळे अनेकांचा खोळंबा झाला.