Pune Ganesh Festival : यंदा पुण्यात गणपती मिरवणूक चर्चेचा विषय ठरली. दोन वर्षांनी मोठ्या उत्साहाने पुणेकरांनी गणेशोत्सव साजरा केला. अनंत चतुर्दशीला सुरु झालेली विसर्जन मिरवणूक थेट 29 तासांनंतर संपली. 28 तास झाल्यानंतरही मिरवणुका संपल्या नव्हत्या. शहरात नागरीकांच्या मोठ्या रांगा होत्या. त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणुक यंदा विक्रम करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत होता. काल अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी 10 वाजता मिरवणुकीचा नारळ फोडण्यात आला होता. त्यानंतर 29 तासानंतर म्हणजेच 5:30 वाजता पुण्यातील शेवटच्या गणपतीचं विसर्जन झालं.
Pune Ganesh Festival : अखेर 29 तासांनंतर पुण्यातील गणपती विसर्जन मिरवणूक संपली; मानाच्या गणपतींनी उशीर केल्याने मिरवणूक खोळंबली
शिवानी पांढरे | 10 Sep 2022 06:12 PM (IST)
अनंत चतुर्दशीला सुरु झालेली विसर्जन मिरवणूक थेट 29 तासांनंतर संपली. 28 तास झाल्यानंतरही मिरवणुका संपल्या नव्हत्या. शहरात नागरीकांच्या मोठ्या रांगा होत्या. त्यामुळे यंदा पुण्यातील गणपती विसर्जनाची मिरवणुक यंदा विक्रम करणार का ? असा प्रश्न उपस्थित होत होता.
pune