Tokyo Olympics : टोकियो ऑलिम्पिकमध्ये चांगली कामगिरी करणारे भारतीय ऑलिम्पिकवीर आज भारतात परत येणार आहेत. आज पदकविजेत्या भारतीय खेळाडूंचा दिल्लीतील अशोका हॉटेलमध्ये सन्मान केला जाणार आहे. आधी हा सत्कार समारंभ मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडिअममध्ये होणार होता, मात्र खराब वातावरणामुळं नंतर हा समारंभ अशोका हॉटेलमध्ये होणार आहे. या कार्यक्रमाला पंतप्रधान मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊन संबोधित करणार असल्याची देखील माहिती आहे. सायंकाळी साडेसहा वाजता हा कार्यक्रम होणार आहे. 


स्पोर्ट्स अथॉरिटी आफ इंडिया (SAI) नं या कार्यक्रमाचं आयोजन केलं. आहे. भारतानं या ऑलिम्पिकमध्ये आतापर्यंतची सर्वाधिक सात पदकं जिंकली आहेत. यात एक सुवर्ण, दोन रौप्य आणि तीन कांस्यपदक जिंकलं आहे. आजच्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांच्यासह काही माजी खेळाडू आणि सरकारी अधिकारी उपस्थित राहणार आहेत.  


टोकियो ऑलिम्पिकचा काल रविवारी समारोप सोहळा पार पडला. यावेळी 205 देशांतील हजारो खेळाडूंनी ऑलिम्पिकमध्ये भाग घेतला आणि पदके जिंकण्याचा प्रयत्न केला. भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये 7 पदकांसह ऐतिहासिक कामगिरी केली आङे. भारताच्या खात्यात एक सुवर्ण, 2 रौप्य आणि 4 कांस्य पदके आली. आता पुढील ऑलिम्पिक 2024 मध्ये फ्रान्सची राजधानी पॅरिस येथे होणार आहे.


India at Tokyo 2020: टोकियो ऑलिम्पिकचा समारोप, भारताने 7 पदके जिंकली, आता 2024 मध्ये पॅरिसमध्ये भव्य स्पर्धा होणार


टोकियोमध्ये भारताची कामगिरी अशी होती
भारताने टोकियो ऑलिम्पिकमध्ये वेटलिफ्टर मीराबाई चानूच्या रौप्य पदकासह शानदार सुरुवात केली. यानंतर भारताला अनेक कांस्य पदके आणि दोन रौप्य पदक मिळाली. भालाफेकपटू नीरज चोप्राच्या सुवर्णपदकासह देशाची ऑलिम्पिक मोहीम संपली. यावेळी भारताला ट्रॅक अँड फील्ड स्पर्धेत पहिले पदक मिळाले, जे 13 वर्षांनंतर पहिले सुवर्णपदकही होते. याशिवाय हॉकीमध्ये 41 वर्षांपासून सुरू असलेल्या पदकाची प्रतीक्षाही संपली आहे. या ऑलिम्पिकमध्ये भारतालाही सर्वाधिक 7 पदके मिळाली.


या खेळांमध्ये भारताला पदके मिळाली
भालाफेकपटू नीरज चोप्राने भारताला सुवर्णपदक दिलं. वेटलिफ्टर मीराबाई चानू आणि पैलवान रवी दहिया यांनी देशाच्या खात्यात रौप्य पदकांची भर घातली. त्यांच्याशिवाय बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, बॉक्सर लवलिना बोर्गोहेन आणि कुस्तीपटू बजरंग पुनिया यांनी आपापल्या खेळात कांस्यपदक जिंकून भारताच्या पदकांची संख्या वाढवली. विशेष गोष्ट म्हणजे भारतीय पुरुष हॉकी संघाने चमकदार कामगिरी करत कांस्यपदक जिंकून इतिहास रचला. एकूण 7 पदकांसह भारताने पदकतालिकेत 48 वे स्थान मिळवले.