समाज माध्यमांमध्ये होत असलेल्या निराधार बदनामीमुळे आपल्या मालमत्ता विकण्यास अडथळे येत असल्याची खंत डीएसकेंनी व्यक्त केली. शिवाय काही जणांच्या टोळक्यांनी आपल्याला उद्ध्वस्त करण्याचा डाव आखल्याचा आरोपही कुलकर्णी यांनी केला.
त्यामुळे न्यायालयानेच एका चार्टर्ड अकाऊंटंटची नेमणूक करुन मालमत्ता विक्री करण्यास मदत करण्याची मागणी डीएसकेंनी केली आहे.
दरम्यान, आता उद्या (समोवार) डीएसकेंच्या अटकपूर्व जामिनावर मुंबई उच्च न्यायालय काय निर्णय देतंय, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
दुसरीकडे डीएसकेंविरुद्ध गुंतवणूकादारांनी थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. पुण्यातील चित्तरंजन वाटिकेमधे दर रविवारी भरणाऱ्या आरटीआय कट्ट्यावर गुंतवणूकदारांनी हा निर्णय घेतला आहे. याचबरोबर डीएसकेंच्या मालमत्तांचा लिलाव करून गुंतवणूकदारांचे पैसे परत मिळावेत यासाठी राज्य सरकार आणि आरबीआयकडे पाठपुरावा करण्याचेही या गुंतवणूकदारांनी ठरवलं आहे
VIDEO : पाहा डीएसके काय म्हणाले?
संबंधित बातम्या
डीएसकेंविरोधात गुंतवणूकदार सुप्रीम कोर्टात जाणार
कोठडीत पाठवायला एक क्षण पुरे, हायकोर्टाची डीएसकेंना तंबी
कोणाला फसवायला मी काही विजय मल्ल्या नाही : डी एस कुलकर्णी
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
बँकांकडून डीएसकेंच्या मालमत्ता जप्तीला सुरुवात
डीएसकेंचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टानं फेटाळला
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट
राज ठाकरे डीएसकेंच्या पाठीशी!
शून्यातून विश्व निर्माण करणारे डीएसके अडचणीत, माझाचा विशेष रिपोर्ट