Raja Dixit Sadanand More Resignation :  विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष डॉ.राजा दीक्षित  (Raja Dixit Resignation) आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष सदानंद मोरे (Sadanand more Resignation) या दोघांनी त्यांच्या पदांचे राजीनामे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांनी राजा दीक्षित  आणि सदानंद मोरे यांना लिखित स्वरूपात त्यांचे राजीनामे मागे घेण्याची विनंती केल्यानंतर त्यांनी राजीनामे मागे घेण्याचं ठरवलं आहे. 


प्रशासकीय पातळीवर होणाऱ्या त्रासामुळे राजा दीक्षित  यांनी विश्वकोश निर्मिती मंडळाचा तर सदानंद मोरे यांनी महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर मंत्री दीपक केसरकर यांनी या दोघांची भेट घेतली. दीपक केसरकरांनी दोघांना लेखी पत्रही दिले.  त्यानंतर या दोघांनी राजीनामा मागे घेण्याचं ठरवलं आहे. प्रशासकीय पातळीवर आपल्याला डावलेले जात होते, असा या दोघांचा आरोप होता. त्यामुळे तडकाफडकी राजीनामा दिला होता. 


सदानंद मोरे काय म्हणाले?


विश्व मराठी  संमेलनात आम्हाला सहभागी करुन घेतंल नाही. या संमेलनाचं निमंत्रणदेखील दिलं नाही. त्यामुळे अशा परिस्थिती काम करणं शक्य नसल्याचं मोरेंनी म्हटलं आहे. दीपक केसरकर हे अत्यंत संवेदनशील मंत्री आहे. संमेलनासाठी दोन कोटी देण्याचा चांगला निर्णय त्यांनी घेतला आहे. वाईमध्ये विश्वकोशासाठी ते काम करत आहेत. केसरकरांनी राजीनाम्यानंतर आमच्या घरी येऊन आमची भेट घेतली. आमच्या समस्या जाणून घेतल्या आहेत. त्यानंतर त्यांनी योग्य निर्णय घेणार असल्याचं देखील सांगितलं आहे. त्यामुळे ते योग्य निर्णय घेतील,असंही मोरेंनी स्पष्ट केलं आहे. आमच्याकडे असलेली पदं राजकारण निरपेक्ष आणि पक्षनिरपेक्ष अशी पदं आहेत. त्यानुसार आम्ही कामं केली आहेत. मराठी भाषेसाठी मागील 50 वर्ष आम्ही कार्यरत आहोत, असंही ते म्हणाले. 


राजा दीक्षित काय म्हणाले?


ज्येष्ठ इतिहासतज्ज्ञ, संशोधक आणि लेखक तथा मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित (Raja Dixit Resignation) यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला होता. विश्वकोशाचे काम ठप्प ठेवण्याचा पद्धतशीर प्रयत्न केल्याचा आरोपही दोन पानी राजीनामा पत्रातून राजा दीक्षित यांनी केला होता. मला पदाचा कोणताही मोह नव्हता. पदावर असण्याचा किंवा नसण्याचा मला काही फरक पडणार नाही. माझे लेखन आणि संशोधन, सामाजिक कार्य यापुढे देखील चालूच राहील, असं राजा दीक्षित (Raja Dixit Resignation) यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटलं आहे. 


संबंधित बातमी-


Raja Dixit Resignation : मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष राजा दीक्षित यांचा तडकाफडकी राजीनामा