पुणे : पुणे रॅश ड्रायव्हिंग प्रकरणात ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्यानं पुणे पोलिसांनी डॉ. अजय तावरे आणि श्रीहरी हळनोर यांना अटक केली आहे. यानंतर तावरे यांनी थेट या प्रकरणातील सगळ्यांची नावं समोर आणेन, असं ते म्हणाले. त्यानंतर या प्रकरणात मोठा वादंग निर्माण झाला. ससून रुग्णालयात हा प्रकार घडत असल्याचं कळताच ससूनच्या कारभारावर आणि डॉक्टरांवर अनेक अनेक प्रश्न चिन्ह उपस्थित केले. आता तावरे नेमकं कोणा कोणाचे नावं समोर आणतात, या कडे सर्वाचं लक्ष असताना विरोधकांकडून तावरेंच्या जीवाला धोका असल्याचं बोललं जात आहे. त्यातच पुणे लोकसभेचे वंचितचे उमेदवार वसंत मोरेंनी ट्विट करुन तावरेंनी नावं सांगावे आणि त्यांना सुरक्षा पुरवू, असं म्हटलं आहे.
हिम्मत असेल तर ससूनच्या डॉ. तावरे यांनी बिनधास्त दोषींची नावे घ्यावीत. गरज पडल्यास वंचित बहुजन आघाडी म्हणून त्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना आम्ही 24 तास संरक्षण देवू, असं त्यांनी ट्विटमध्ये लिहिलं आहे. डॉ. अभय तावरेंनी बिल्डर पुत्राचे रक्ताचे नमुने बदलले. यासाठी त्यांनी तीन लाख रुपये घेतले. मात्र पोलिसांनी दोन रक्ताचे नमुने घेऊन दोन वेगवेगळ्या लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले होते. ससून मधील रिपोर्ट निगेटीव्ह आला. त्यानंतर डिएनए टेस्ट मॅच झाली नाही आणि नमुने बदलल्याची घटना समोर आली. या प्रकरणी तावरे आणि हळनोर यांना पुणे पोलिसांनी अटक केली आहे.
त्यांना अटक केल्यानंतर तावरे यांनी रागारागात सगळ्यांचीच नाव समोर आणेन असं म्हटलं आणि त्यानंतर या प्रकरणाला राजकीय वळण प्राप्त झालं. तावरे यांच्या नियुक्तीसाठी आमदार सुनिल टिंगरेंनी शिफारस पत्र दिल्याचं समोर आलं आणि त्यानंतर सुनिल टिंगरेंचं नाव या प्रकरणात पुन्हा एकदा पुढे आलं. आता या प्रकरणात कोणाची नावं पुढे येतात हे पाहावं लागले मात्र त्यापूर्वीच त्याच्या जिवाला धोका असल्याचं विरोधक म्हणत आहे. सुषमा अंधारेंनी देखील त्यांच्या जिवाला धोका असल्याचं म्हटलं आहे.
इतर महत्वाची बातमी-