CCTV : पुण्यात रूग्णाच्या नातेवाईकांकडून डॉक्टरांना मारहाण
एबीपी माझा वेब टीम | 01 Aug 2016 03:19 AM (IST)
पुणे : पुण्याच्या ससून रुग्णालयातील डॉक्टरांना जबर मारहाण करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना संरक्षण देण्याचं आश्वासन देऊन आठवडाही उलटला नाही तेवढ्यात ही घटना घडली आहे. मृत रूग्णांच्या नातेवाईकांनी डॉ. सादिक मुल्ला आणि डॉ. अभिजीत जवानजा यांना बेदम मारहाण केली आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं रुग्ण दगावल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. मारहाणीत दोन्ही डॉक्टर गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर ससूनमध्येच उपचार सुरू आहेत. मारहाणीप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. मारहाण करणाऱ्या 5 जणांना पोलिसांनी अटक केली. दरम्यान गेल्या काही दिवसांत रूग्णालयातील डॉक्टरांना मारहाणीचे प्रकार वाढले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी पुण्यातील मार्डनं उदया संध्याकाळी 5 वाजेपर्यंत संप पुकारला आहे. पाहा व्हिडीओ -