पिंपरी : गर्भपात करण्यास नकार दिल्यानं पिंपळे सौदागरमध्ये एका स्त्रीरोगतज्ज्ञावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. डॉ. अमोल बीडकर असं हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचं नाव आहे. डॉक्टर बीडकर यांची प्रकृती स्थिर असून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
काही दिवसांपूर्वी एक अविवाहित जोडपे गर्भपात करण्यासाठी डॉक्टर बीडकर यांच्याकडे आले होते. मात्र तपासणीत हा गर्भ 19 आठवड्यांपेक्षा जास्त असल्याचे आढळले. त्यामुळे डॉक्टर बीडकरांनी गर्भपात करण्यास नकार दिला.
त्यानंतर पुन्हा एकदा हे जोडपे काही युवकांसह डॉक्टर बीडकरांकडे आले. मात्र, त्यावेळीही डॉक्टरांनी गर्भपातस नकार दिल्याने त्या युवकांनी डॉक्टरांवर कोयत्याने हल्ला केला.
या प्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तर डॉक्टर बीडकरांची प्रकृती स्थिर असल्याने, उपचारानंतर त्यांना घरी सोडण्यात आलं आहे.
गर्भपातास नकार दिला म्हणून डॉक्टरवर चाकूहल्ला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
10 Sep 2017 12:10 PM (IST)
गर्भपात करण्यास नकार दिल्यानं पिंपळे सौदागरमध्ये एका स्त्रीरोगतज्ज्ञावर कोयत्याने हल्ला करण्यात आला आहे. डॉ. अमोल बीडकर असं हल्ल्यात जखमी झालेल्या डॉक्टरचं नाव आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -