पुणे : पुण्यात घरगुती गणपती विसर्जन करण्यावरुन आता नवीन वाद सुरु झालाय. महापालिकेने गणपती विसर्जनासाठी जे फिरते हौद केले आहेत, ते हौद म्हणजे कचराकुंड्या असल्याचा आरोप मनसे आणि ब्राम्हण महासंघाने केला आहे. मात्र, महापालिकेने हे सर्व आरोप फेटाळले आहेत.


यंदा कोरोनाचं संकट असल्यामुळे प्रशासनाने घरगुती गणपतीचं विसर्जन घरीच करावं, असं आवाहन पुणेकरांना केलं. त्यानंतर महापालिकेकडून 15 क्षेत्रीय भागात 30 फिरते हौद ठेवले आहेत. काल दीड दिवसांच्या गणपतीच विसर्जन बहुतेक जणांनी याच हौदात केलं. मात्र, महाराष्ट्र निर्माण सेना, ब्राम्हण महासंघ यांनी फिरते हौद हे कचराकुंड्याच्या गाडीत करत असल्याचा आरोप करत आंदोलनाचा इशारा दिलाय. काल विसर्जन सुरु असताना हौदामधील विसर्जन मनसेने बंद पाडलं. तसेच हे हौदामधील विसर्जन थांबवले नाही तर हौद पाडून टाकू, अस म्हटलंय.

मुंबई लोकल आणि ई पास बाबत घाईगडबडीत निर्णय घेणार नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

महापालिकेने आरोप फेटाळले
पुण्यामध्ये गणपती विसर्जनासाठी कचराकुंड्या दिल्याचा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळलाय. गेल्या वर्षी वापरण्यात आलेले विसर्जन हौदच यावर्षी फिरते हौद म्हणून उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. असं असताना काही लोक संकुचित राजकारण करुन पुणे शहराचे नाव बदनाम करत असल्याचा प्रत्यारोप महापौरांनी केला आहे. या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी कचऱ्याची गाडी आणि फिरते विसर्जन हौद अशा दोन्ही गाड्या माध्यमांसमोर आणल्या.

गेल्यावर्षी 14 हजार मूर्तींचं विसर्जन करण्यात आले होते. यंदा फिरत्या हौदात 679 तर 610 मूर्ती दान केल्या आहेत. जवळपास 12 हजार 700 जणांनी गणपतीचे घरीच विसर्जन केले. पुणे शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता गणेशोत्सव साध्यापणाने साजरा करण्याच निर्णय घेतला. मात्र, गणपती बसण्याअगोदर मंडपात की मंदिरात गणेशोत्सव साजरा करायचा हा वाद होता. तर आता गणपती विसर्जित करण्यावरून वाद निर्माण झाला आहे.

Ganeshotsav 2020 | पुण्यातल्या तांबडी जोगेश्वरीच्या गणरायाची आरती! घरबसल्या घ्या बाप्पाचं दर्शन!