पुणे: गाढवाला कितीही चंदन लावलं तरी ते उकिरड्यावर जाऊन अंगाला राख लावणारच, संत तुकाराम महाराजांनी त्यांच्या ओवीत हेच सांगितलेलं आहे. सध्याच्या राजकीय धुराळ्यात कोण आपल्या अंगाला राख लावून घेतंय हे सर्वांनाच माहिती आहे, मी कोणाबद्दल बोलतोय याची तुम्हाला कल्पना आहेच असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadanvis) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जहरी टीका केली. पिंपरी चिंडवडमधील विकास कामांच्या उद्घाटनाच्या प्रसंगी बोलताना त्यांनी ही टीका केली. 


नटसम्राटासारखं वागू नका, नाहीतर कट्यार काळजात घुसेल


देवेंद्र फडणवीस म्हणाले की, तुकाराम महाराजांच्या नावाने पिंपरीमध्ये नाट्यगृह होत आहे ही त्यांना दिलेली सांस्कृतिक वंदना आहे. अलिकडच्या काळात नाट्यगृहाच्या बाहेरच जास्त नाटकं होतात. मानापमानाच्या गोष्टी होतात, मनातील कथाकथन रचले जातात, खोटे नाटे आरोप होतायेत. त्यामुळे संशयकल्लोळ सुरू आहे. पण जनता सुज्ञ आहे.  नटसम्राटासारखं वागलं म्हणजे नटसम्राट होता येत नाही हे काही लोकांना सांगायचं आहे. तसं केलं तर कट्यार काळजात घुसणार हे नक्की. शेवटी आमच्या एकनाथ शिंदेंनी डंपर पलटी केलाच आहे. 


पिंपरी चिंचवडचे आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकारातून शहरामध्ये विविध विकासकामांचे उद्धाटन करण्यात आलं. त्यावेळी देवेंद्र फडणवीसांनी राज्यातल्या शहरांच्या विकासाची दिशा कशी आहे याची माहिती दिली. शहरांच्या विकासामध्ये पर्यावरणाचा ऱ्हास कसा रोखता येईल, प्रदूषण कसे कमी करता येईल याची माहिती त्यांनी दिली. 


अजित पवार गटावर भाजपच्या आमदार महेश लांडगेंची टीका 


राज्यातील सत्तेत असलेल्या अजित पवार गटावर भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेली वीस वर्ष या समाविष्ट भागांकडे दुर्लक्ष झालं. 1997 ते 2017 या काळात राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना या समाविष्ट गावांसाठी झालेल्या विकासाची टॅली करावी आणि भाजप सत्तेत आल्यानंतर म्हणजे, गेल्या सात वर्षांतील विकास कामांचा अभ्यास करावा. भाजप सत्तेत आल्यानंतर या ठिकाणी पाच हजार कोटींचा विकास झाला. आमदार अण्णा बनसोडे आपल्याला भूतकाळात जायचं नाही, यात कोणी दुर्लक्ष केलं यावर मला भाष्य करायचं नाही. पण भाजप या समाविष्ट गावांचा कायापालट करत आहे.


ही बातमी वाचा :



VIDEO : Devendra Fadnavis on Uddhav Thackeray : गाढवाला चंदन लावलं तरी उकिरड्यावर जाऊन..., ठाकरेंवर टीका