Deepak Kesarkar In Pune: खासदार उदयन राजे भोसले यांनी शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी यांची भेट घेतली आहे. पुण्यातील विश्रामगृहात या दोघांनी भेट घेतली. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केलं. शिंदे गटाने जो उठाव केला तो उठाव करायला धैर्य लागतं नाहीतर शिवसेनेचे सगळे आमदार आले असते, अशी टीका शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी शिवसेनेवर केली आहे.
पश्चिम महाराष्ट्रात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जबरदस्त स्वागत झालं. कॅबिनेट सामूहिक जबाबदारी असते. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असताना अनेक शहरामध्ये जाणार आहे. त्या शहरातील जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार आहे. सातारा, कोल्हापूर आणि त्यानंतर सिंधुदुर्ग या शहरात देखील भेट देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
लवकरच खाते वाटप होणार
मंत्रिमंडळ विस्तार झाला. 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. त्यानंतर सगळेच मंत्री कामाला लागले आहे आता लवकरच खाते वाटप होणार असल्याचं ते म्हणाले. आमच्यातले काही आमदार नाराज नाही.पहिल्या टप्प्यात अनेकजण मंत्रीपद सोडून आले होते. आम्ही सगळे गेलो तेव्हा 7 मंत्री होते. मनाचा मोठेपणा थोडा पहिल्या टप्प्यात दाखवावा लागतो. मंत्रिपदाचा दुसरा टप्पा येईल त्यावेळी सगळ्यांना संधी मिळेल. बच्चू कडू यांचा देखील योग्य मान राखला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
गृहमंत्र्यांकडे शिर्डीचा विषय मांडू
मी गृह खात्याचा मंत्री होतो त्यावेळी झिरो क्राईम सीटी शिर्डी असावी अशी आमची अपेक्षा होती. भारतातील सर्व भागातून भाविक शिर्डीत येतात. त्यामुळे भाविकांना त्रास होऊ नये. या त्रासामुळे भाविकांमध्ये आणि त्यांच्या मार्फत विविध शहरात शिर्डीची वाईट प्रतिमा लोकांपर्यंत जाते, असं होऊ नये. यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहे. गृहमंत्री कार्यभार सांभाळतील त्यावेळी या बाबी आम्ही त्यांच्यासमोर मांडणार असल्याचं देखील त्यांनी सांगितलं.
चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल
कलंकित मंत्री हा आरोप एक वर्षांपूर्वी संजय राठोड यांच्यावर करण्यात आला होता तो आरोप सिद्ध झाला नाही. एका समाजाला मंत्रीपद द्यावे म्हणून बंजारा समाजाला दिलेले वचन मुख्यमंत्री यांनी पाळलं. तरुणीच्या आत्महत्येची चौकशी अजुन सुरू आहे. चित्रा वाघ म्हणत असतील तर चौकशी होईल. निःपक्षपातीपणे चौकशी होईल परंतु जर दोषी नसतील तर मंत्री का देऊ नये. त्यांचा दोष आढळला तर कारवाई झाली असती, असंही ते म्हणाले. महिलांच्या बाबतीत आम्ही न्याय देण्यासाठी आहोत, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
उद्धव ठाकरेंबाबत मी काहीच बोलत नाही
आरेमध्ये पैशाचा अपव्यय झाला असता. एखाद्या गोष्टीमुळे असे प्रकल्प रखडले तर नुकसान होतं. सुप्रीम कोर्टाने याबाबतची परवानगी दिली होती. शेवटी पर्यावरण रक्षण झालं पाहिजे. सर्वसामान्य जनतेसाठी काम केलं जातं आहे. यावरून मी उद्धव ठाकरे यांच्याबाबत मी काहीच बोलत नाही कारण बोललं तर मी टीका केली अशी बातमी होते, अशा शब्दात त्यांनी स्पष्टीकरण दिलं.