Land Slide on Pune Mumbai Railway : खंडाळा (Khandala) आणि लोणावळ्यादरम्यान (Lonavla) दरड कोसळल्यानं (Land Slide) पुण्याहून मुंबईच्या दिशेनं होणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असून अद्याप रेल्वे एक तास उशिरानं धावत आहे. लवकरच रेल्वे सेवा पूर्ववत होणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.


पुणे-मुंबई (Mumbai) लोहमार्गावर दरड कोसळली आहे. मंकीहील ते ठाकूरवाडी दरम्यान ही घटना मध्यरात्री घडलेली असून, अद्याप दरड हटविण्याचं काम युद्ध पातळीवर सुरू होतं. अप लाईनवर ही दरड कोसळल्याने मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद ठेवण्यात आली होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्यानं रेल्वे सेवा सुरळीत सुरू होती. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे. सध्या रेल्वे उशिरानं धावत आहे. 


दरड कोसळल्याची माहिती मिळताच रेल्वेचे अधिकारी, कर्मचारी आणि सर्व यंत्रणा तात्काळ घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर युद्ध पातळीवत दरड बाजुला काढण्याचं काम सुरू करण्यात आलं. सध्या दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असून लवकरच रेल्वे वाहतूक सुरळीत होईल, अशी शास्वती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. 



पुण्याहून मुंबईच्या दिशेने जाणार्‍या रेल्वे गाड्या खंडाळा, लोणावळा आणि इतर विविध रेल्वे स्थानकांवर थांबविण्यात आल्या आहेत. तर मुंबईहून पुण्याच्या दिशेने येणार्‍या रेल्वे गाड्या कर्जत रेल्वे स्थानकावर थांबविण्यात आल्या आहेत. दरड हटवण्याचं काम पूर्ण झालं असलं तरी अद्याप वाहतूक पूर्वपदावर आलेली नाही. वाहतूक पूर्वपदावर येण्यासाठी आणखी काही काळ लागणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनानं दिली आहे. 


रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, "आज 12 ऑगस्ट रोजी लोणावळ्या नजिक पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळल्यामुळे रेल्वे सेवा ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांना पाठवण्यात आलं. बोल्डर आणि ओएचईचा खांब पडल्यानं मार्ग ठप्प झाला आहे. दरड हटवण्याचं काम युद्धपातळीवर सुरु होतं. अथक परिश्रमानंतर दरड हटवण्यास यश आलं आहे. अप लाईनवर ही दरड कोसळल्यानं मुंबईकडे जाणारी रेल्वे सेवा बंद होती. अप लाईनवरील वाहतूक मिडल लाईनकडे वळविण्यात आल्याने रेल्वे सेवा सुरळीत सुरू आहे. मात्र अप लाईन पूर्व पदावर येण्यासाठी बराच अवधी लागणार आहे."


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


PHOTO : पुणे-मुंबई लोहमार्गावर दरड कोसळली, वाहतुकीवर परिणाम