Maharashtra Pune News Updates: एका अज्ञात व्यक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींना (PM Modi) जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. अज्ञात व्यक्तीकडून ईमेलद्वारे पंतप्रधानांना मारण्याची धमकी देण्यात आली. मी भारतामध्ये सिरीयल बॉम्ब ब्लास्ट करण्याचा प्लॅन करत आहे, मी हिंदू धर्म आणि हिंदू धर्मातील महिलांना नष्ट करेन, अशा आशयाचा मेल करत अज्ञात व्यक्तीकडून धमकी देण्यात आली आहे. "आय विल किल नरेंद्र मोदी अल्सो", असा उल्लेखही मेलद्वारे करण्यात आला आहे. याप्रकरणी पुण्यातील अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बनं उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला. त्यामध्ये असा धमकी देणारा मजकूर होता. सोशल माध्यमांवर विदेशातून ईमेल करत एका व्यक्तीनं ही धमकी दिली होती. एम. ए. मोखीम असं धमकी देणाऱ्या आरोपीचं नाव आहे.  मी अनेक दहशतवादी संघटनांना फंडिंग करतो. हिंदू महिला आणि हिंदूंना देशातून नष्ट करण्यासाठी प्रयत्न करत आहे. देशात अनेक ठिकाणी मृत्यू घडवून आणण्याची धमकीसुद्धा आरोपी मोखीम या नावानं ईमेल वापरणाऱ्या व्यक्तीनं दिली आहे.


दरम्यान, या सगळ्या प्रकारानंतर ज्या व्यक्तीला हा मेसेज आला होता. त्यांनी पुणे शहर पोलीस दलाच्या कंट्रोल रूमला माहिती देऊन पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. एकीकडे पुण्यात दहशतवादी आढळून येत असताना आता भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना विदेशातूनच उडून देण्याचा मेसेज आल्याने खळबळ उडाली आहे.


पुण्यातील दहशतवादी प्रकरणाचा तपास आता NIA करणार 


पुण्यातील दहशतवाद प्रकरण आता राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (NIA) कडे सोपवण्यात आलं आहे. ATS कडून पुण्यात पकडलेल्या दहशतवाद्यांचा तपास आता एन आय ए कडे वर्ग करण्यात आला आहे. थोड्या वेळापूर्वी पुणे सत्र न्यायालयानं तसे आदेश दिले आहेत. मोहम्मद युसुफ खान आणि मोहम्मद युनूस साकी हे दोघे ही दहशतवादी एनआयएच्या मोस्ट वॉन्टेड यादीत सक्रिय होते. 


जयपूरमध्ये ट्रान्सपोर्ट घडवण्याच्या तयारीत असलेले हे दोघेही जण रतलाम मोड्युलशी संबंधित होते. दोन्ही दहशतवादी अल सूफा या दहशतवादी संघटनेशी संबंधित होते. एनआयएनं कोर्टात या प्रकरणी याचिका दाखल केली होती, आज कोर्टानं हा तपास एनआयएकडे वर्ग केला आहे. त्यामुळे आता एनआयए तीन जुलैला अटक केलेले दहशतवादी आणि एटीएस, तसेच पुणे पोलीसांनी अटक केलेले दहशतवादी यांचा तपास करणार आहे.  एनआ ए आणि एटीएसनं अटक केलेले दहशतवादी एकमेकांच्या संपर्कात असल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे.