पिंपरी-चिंचवड: पिंपरी चिंचवडमध्ये सहा वर्षाच्या मुलीच्या हत्या करून आईनं आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. नीलम भामे असं या महिलेचं नाव असून मुलीचं नाव लावण्या आहे.

 

कासारवाडी येथे दुपारी हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला. पती कामावर गेल्यानंतर गळफास घेऊन केली महिलेने आत्महत्या केल्याचं प्रथमदर्शनी समजतं आहे. दरम्यान, याप्रकरणी पोलिसांना आत्महत्येपूर्वी नीलमनं लिहलेली सुसाईड नोट पोलिसांना मिळाली आहे.

 

'माझ्या पतीला मी खुश ठेऊ शकत नाही. त्यामुळे मी आत्महत्या करीत आहे. पण माझ्यामागे मी मुलीला ठेऊन जाऊ शकत नाही. त्यामुळे मी मुलीलाही संपवत आहे. यासाठी कुणालाही जबाबदार धरु नये.' अशा आशयाची सुसाइड नोट पोलिसांना सापडली आहे. दरम्यान याप्रकरणी भोसरी पोलीस अधिक चौकशी करीत आहेत.