चिंचवडमध्ये सिलेंडर स्फोट, दोघांचा मृत्यू, पाच घरं जळून खाक
एबीपी माझा वेब टीम | 25 Oct 2018 07:33 AM (IST)
शंकर क्षीरसागर यांच्या घरात आग लागली आणि तिथेच सिलेंडर स्फोट झाला. त्यानंतर आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरत गेली.
चिंचवड (पुणे) : चिंचवडमध्ये सिलेंडर स्फोट झाला असून, या दुर्घटनेत पाच घरं जळून खाक झाली आहेत. चिंचवडमधील दळवीनगर परिसरातील झोपडपट्टीत मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास ही दुर्घटना घडली. या सिलेंडर स्फोटात दोघांचा होरपळून मृत्यू झाला. प्रदीप मोटे आणि शंकर क्षीरसागर अशी मृतांची नावं आहेत, तर शंकर राऊत, हरी मनोहर, मंगल खरात, शंकर आणि राजाबाई जाधव यांची घरं जळून खाक झाली आहेत. शंकर क्षीरसागर यांच्या घरात आग लागली आणि तिथेच सिलेंडर स्फोट झाला. त्यानंतर आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरत गेली. दरम्यान, सिलेंडर स्फोटाची दुर्घटना घडल्यानंतर तातडीने अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे.