पिंपरी चिंचवड : मुलाला 'गे' संबोधल्याने राग अनावर झालेल्या शिक्षिकेने विद्यार्थ्याला मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. पिंपरी चिंचवडमधील सेंट उर्सुला शाळेत ही घटना घडली. विद्यार्थ्यांच्या पोटाला मुका मार लागल्याने त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मारहाण करणाऱ्या शिक्षिकेचा मुलगा आणि जखमी विध्यार्थी एकाच व्हॅनमधून शाळेत येतात. सोमवारी शाळेत येताना शिक्षिकेचा मुलगा व्हॅनमध्ये पुढे बसला असताना, मागून काही मुलांनी त्याला 'गे' म्हणून चिडवायला सुरुवात केली. ही बाब त्याने शिक्षिका असणाऱ्या आईच्या कानावर घातली.
मग संतापलेल्या शिक्षिकेने संबंधित विद्यार्थ्याला बोलावून हाताने मारहाण केली. यात मुलाच्या पोटाला मुका मार लागला आहे. सध्या त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असून, शाळेने यावर बोलायला नकार दिला.
मुलाला 'गे' संबोधल्याने शिक्षिकेची विद्यार्थ्याला मारहाण
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
23 Oct 2018 03:56 PM (IST)
सोमवारी शाळेत येताना शिक्षिकेचा मुलगा व्हॅनमध्ये पुढे बसला असताना, मागून काही मुलांनी त्याला 'गे' म्हणून चिडवायला सुरुवात केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -