पुणे : पुण्यात गुन्हेगारीत सातत्याने (Pune Crime News) वाढ होताना दिसत आहे. तरुणीचा पाठलाग करुन तिच्याकडे लग्नाची मागणी घातली. तिने नकार दिला असता चिडलेल्या तरुणाने तिला धमकी देत विनयभंग केल्याची घटना घडली. ही घटना पिंपरी चिंचवडमधील मोरवाडी येथे घडली. रुग्णवाहिकेच्या काचेवर दगड मारुन काच फोडून नुकसान केले. आज फक्त रुग्णवाहिकेची काच फोडली आहे. उद्या तुझ्या पप्पाना फोडून काढेल, असे म्हणून फिर्यादी यांना धमकी दिल्याचे तक्रारीत म्हटले आहे.


मला तुझ्याबरोबर बोलायचे आहे. माझे तुझ्यावर प्रेम आहे. तू माझ्याशी लग्न करशील का, असे म्हणत त्याने लग्नाची मागणी घातली. त्यावेळी तरुणीने नकार दिला. या रागातून आरोपीने तरुणीचा विनयभंग केला. याप्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे. आरोपी पीडित तरुणीला एप्रिल 2023 पासून त्रास देत होता. कृष्णा हनुमंत पुजारी असं 27 वर्षीय तरुणाचं नाव आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी वाकड येथील एका हॉस्पिटलमध्ये काम करते. त्या कामाला जाण्यासाठी फिनोलेक्स चौकापर्यंत पायी चालत जात होत्या. त्यावेळी कृष्णा याने फिर्यादी यांचा दुचाकीवरुन पाठलाग करुन आडवले आणि तिचा विनयभंग केला. 


पिपरी-चिंचवडमध्ये अत्याचार अन् लैगिंक शोषणात वाढ


त्यासोबत पिंपरीत घडलेल्या दुसऱ्या घटनेत अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. तरुणी ही गर्भवती राहिल्याने हा सर्व प्रकार उघडकीस आला. हा प्रकार चाकण येथील एका कंपनीच्या जवळ मे 2023 रोजी घडला आहे. याप्रकरणी परप्रांतीय आरोपीला अटक केली आहे. या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी पोलिसांत धाव घेतली आहे. त्यानुसार रंजित साथ करा यांच्यावर  गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


पुणं मुलींसाठी असुरक्षित?


पुण्यात मागील काही वर्षांपासून बलात्काराचं प्रमाण प्रचंड वाढलं आहे. रोज अनेक असे प्रकार समोर येतात. कधी कशाचं आमिष दाखवून तर कधी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत हे प्रकार सुरु आहेत. त्यात सर्व वयातील मुली आणि महिलांचा समावेश आहे. अनेकदा बॅड टच आणि गुड टच या वर्गातून माहिती समोर येते तर अनेकदा पिडीत महिला स्वत: पोलिसांत जावून तक्रारी देतात. 


इतर महत्वाची बातमी-


Sasoon Hospital Drug Racket : ललित पाटीलचा कारागृहातील कैदी म्हणून नावालाच शेरा, मात्र गावभर मारतोय फेरा; पोलीस, ससून व्यवस्थापन अन् राजकीय नेत्यांवर संशयाची सुई