वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल पिंपरीच्या शाळेत
एबीपी माझा वेब टीम | 30 Apr 2017 03:38 PM (IST)
पिंपरी : वेस्ट इंडिज आणि आयपीएलच्या रॉयल चॅलेंजर ऑफ बेंगलोरचा धडाकेबाज फलंदाज ख्रिस गेल आज चक्क पिंपरीत आला होता. पिंपरी-चिंचवडच्या एसएनबीपी शाळेतल्या मैदानाचं उद्घघाटन ख्रिस गेलच्या हस्ते झालं. यावेळी ख्रिस गेलचं मराठमोळ्या पद्धतीनं स्वागत झालं. विद्यार्थ्यांनाही गेलसोबत सेल्फी काढण्याचा मोह आवरला नाही. आपण लहानपणी क्रिकेट खेळताना अनेक इमारतींच्या काचा फोडल्या, आणि शिक्षकांचाही मार खाल्ल्याची कबुली ख्रिल गेलनं यावेळी दिली. तसेच लहानपणी बॅट हाती घेतल्यापासूनच चौकार षटकारांची आतिषबाजी करण्याची सवय असल्याचंही गेलंनं सांगितलं. विशेष म्हणजे, गेलनं यावेळी त्याच्या आवडत्या क्रिकेटर्सचीही नावं सांगितली. ब्रायन लारा, सचिन तेंडुलकर आणि सौरभ गांगुली या तिघांचा आपण फॅन असल्याचंही गेलनं म्हटलं आहे.