मुंबई : सलगच्या सुट्ट्यांमुळे मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या वाहनांमध्ये, तसेच मुंबईहून कोकणात जाणाऱ्या वाहनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या दोन्ही महामार्गांवर वाहतूक कोंडीची स्थिती निर्माण झाली आहे.
शुक्रवारी अक्षय्य तृतीया, शनिवार, रविवार आणि सोमवारी महाराष्ट्र दिन, अशा सलगच्या चार सुट्ट्या आल्याने या दोन्ही महामार्गांवरील वाहनांची संख्या वाढली आहे.
मुंबई-पुणे महामार्ग
मुंबई-पुणे महामार्गावरील बोरघाटात वाहतूक कोंडी झाली आहे. जवळपास 5 किलोमीटरवर वाहनांच्या रांगा लागल्या असून, वाहतूक अत्यंत धीम्या गतीने सुरु आहे.
मुंबई-गोवा महामार्ग
मुंबई-गोवा महामार्गावरील माणगावजवळ वाहनांची गर्दी झाली आहे. कोकणात जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम पाहायला मिळतो आहे.