पिंपरी चिंचवड : चिंचवडमध्ये सकाळी सहा दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. गुरुद्वारा चौकातील वैष्णोदेवी मंदिराजवळच्या सोसायटीत सकाळी 4 वाजण्याच्या सुमाराही ही घटना घडली.
सुरुवातीला एका दुचाकीला आग लागली. त्यानंतर शेजारी उभ्या असलेल्या दुचाकींनी देखील पेट घेतला. अग्निशमन दलाची गाडी येईपर्यंत सहाही दुचाकी जळून खाक झाल्या होत्या.
या आगीत शेजारचा मीटर बॉक्स आणि वायरिंगही जळाली आहे. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.