पुणे : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे पुण्यातील मार्केटयार्ड अनिश्चित काळासाठी बंद करण्यात आलं आहे. मार्केटयार्ड आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून फळे, भाजीपाला, कांदा-बटाट्याचा घाऊक व्यापार उद्यापासून म्हणजेच 10 एप्रिलपासून पुढील आदेश येईपर्यंत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.


श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आणि त्याच्या आजूबाजूला असलेल्या परिसरामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव फार मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे सर्व परिसर सील करुन कर्फ्यू सुद्धा लावला आहे. त्यामुळे जोपर्यंत परिस्थिती आटोक्यात येत नाही, तोपर्यंत संपूर्ण गुलटेकडी मार्केटयार्डमधील सर्व व्यवहार बंद ठेवावेत, अशी विनंती आडते असोसिएशनने कृषी उत्पन्न बाजार समितीला केली आहे.


मार्केटयार्ड परिसरात सध्या कर्फ्यू लावण्यात आला आहे. मार्केट यार्ड परिसर आणि त्याच्या पूर्वेकडील भाग सील करण्यात आला आहे. इथे फक्त बाहेरुन मालाची आवक होत आहे. तसंच घाऊक व्यापाऱ्यांनाच इथे खरेदीसाठी परवानगी दिली जात आहे. याशिवाय बाहेरुन आलेल्या ट्रक, टेम्पोंना गटागटाने आत प्रवेश दिला जात आहे.


कामगार, तोलणार टेम्पो संघटनांचे सर्व सदस्य 10 एप्रिलपासून मार्केटयार्डमध्ये येणार नाहीत. परिणामी इथला चढउतार बंद होणार आहे. त्यामुळे आडते असोसिएशनने 10 एप्रिलपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. 10 एप्रिलपासून कोणत्याही प्रकारच्या शेतमालाची आवाक करु नये, असं आडते असोसिएशनने म्हटलं आहे.


पुण्यात 20 जणांचा मृत्यू
पुणे शहरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असताना या रोगामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्याही चिंताजनक आहे. बुधवारी तब्बल 10 रुग्णांचा मृत्यू झाला. तर आज दोघांनी प्राण गमावले. त्यामुळे पुण्यात मृतांची संख्या 20 वर पोहोचली आहे. यामध्ये बारामतीच्या भाजीविक्रेत्याचा सामावेश आहे.


ससून रुग्णालयात 12
जिल्हा रुग्णालय 1
दिनानाथ रुग्णालय 1
नोबल रुग्णालय 2
जहांगीर रुग्णालय 1
सह्याद्री रुग्णालय 1
डॉ. नायडू रुग्णालय 1
इनामदार रुग्णालय 1


Curfew in Pune | पुण्यात कर्फ्यूच्या आदेशाच्या लोकांकडून चिंधड्या | विशेष रिपोर्ट | ABP Majha


Maharashtra Lockdown | भाजीपाला खरेदीसाठी कल्याण एपीएमसी मार्केटमध्ये व्यापाऱ्यांची तुफान गर्दी