पुणे : पुण्यातील बाधित क्षेत्र वगळून काही प्रकारची दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्याचा निर्णय पुणे महानगरपालिकेने घेतला आहे. या आधी महापालिकेने काही विशिष्ट वस्तूंची विक्री करणारी दुकानं ठराविक दिवशी सुरु करण्यास परवानगी दिली होती आणि त्यासाठी वार ठरवून दिले होते. आता महानगरपालिकेने लॉंड्री, स्टेशनरी, चप्पल, गृह उपयोगी वस्तू आणि फर्निचरची दुकानं देखील उघडण्यास परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे. ही दुकानं उघडण्यासाठी देखील महापालिकेने वार ठरवून दिले आहेत.कन्टेन्मेंट झोनच्या बाहेरील क्षेत्रात ही दुकानं सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
वस्तू विक्रीसाठी ठरवून देण्यात आलेल्या वारांचे वेळापत्रक
- सोमवार : इस्त्री आणि लॉंड्री दुकान, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय
- मंगळवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य, तयार फर्निचरची विक्री
- बुधवार : इस्त्री आणि लॉंड्री दुकान, फूट वेअर, स्टेशनरी दुकान, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय
- गुरुवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य , तयार फर्निचरची विक्री
- शुक्रवार : इस्त्री आणि लॉंड्री दुकान, फूट वेअर, स्टेशनरी दुकान, बांधकाम साहित्य विक्री, वैद्यकीय साहित्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे पुरवठा करणारे व्यवसाय
- शनिवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य, तयार फर्निचरची विक्री, इस्त्री आणि लॉंड्री दुकान, बांधकाम साहित्य
- रविवार : वाहन दुरुस्तीचे साहित्य विक्री, गृह उपयोगी साहित्य, स्टेशनरी दुकान, फूट वेअर, बांधकाम साहित्य विक्री
पुण्यात दुकाने सुरू करताना व्यावसायिकांना तसेच ग्राहकांना नियमांचे पालन करावे लागणार आहे. दुकाने सकाळी 7 ते सायंकाळी 7 या वेळेत सुरू राहणार आहे. दुकानात काम करणाऱ्या सर्व व्यक्तींनी मास्क आणि हातमोजे घालणे अनिवार्य आहे. दुकानात काम करताना दोन कर्मचाऱ्यांमध्ये सुरक्षित अंतर ठेवावे आणि कामगारांना फोटोसह ओळखपत्र मालकांनी द्यावे.
Lockdown 3 | पुणे, पिंपरीत उद्योग सुरु करण्याचे प्रयत्न : जिल्हाधिकारी नवल किशोर राम
संबंधित बातम्या :