पुणे : पुण्यात कुटुंबियांसोबत चारचाकी वाहनात प्रवास करताना मास्क वापरण्याची गरज नाही. ही सवलत फक्त खासगी वाहनांसाठी आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पुण्यातील कौन्सिल हॉलला झालेल्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.


मात्र पुण्यात आता खाजगी वाहनातून प्रवास करताना मास्क वापरण्याची सक्ती असणार आहे. मोटारीच्या काचा बंद असतात, एकाच कुटुंबातील अथवा निकटच्या संपर्कातीलच माणसे एकत्र प्रवास करीत असतात. गाडीच्या काचा बंद असल्याने त्याचा इतरांना काहीही धोका नसतो असे नागरिकांचे म्हणणे आहे.


महापौर मुरलीधर मोहळ म्हणाले,  कुटुंबियांसोबत चारचाकी वाहताना पुणे महापालिका हद्दीतून प्रवास करताना आता मास्क परिधान करण्याची आवश्यकता नसेल. ही सवलत केवळ खासगी वाहनांसाठी असून यात प्रवास करणाऱ्या व्यक्ती कुटुंबातीलच असाव्यात.


एकट्या पुणे शहरातच असे 28 हजारांवर नागरिक आहेत. राज्याचा विचार केला तर हा आकडा काही लाखांत आहे. त्यामुळे मानवतावादी भूमिका घेऊन कलम 188 नुसार पाठविण्यात आलेल्या नोटीसा रद्द कराव्यात, अशी मागणी गृह मंत्र्यांकडे केली आहे. गृह मंत्र्यांनी गृह विभागाच्या सचिवांशी चर्चा करून राज्य पातळीवर निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे.


लॉकडाऊनमध्ये नियमभंगाचे खटले मागे घेण्याबाबत सरकार सकारात्मक


लॉकडाऊनच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईसाठी पाठविलेल्या कलम 188 च्या नोटीसा मागे घेण्याबाबत गृह विभागाशी चर्चा करत आहोत. याबाबत सकारात्मक चर्चा करून नागरिकांना त्रास होणार नाही याची पूर्ण काळजी घेऊ, असे आश्वासन गृह मंत्री अनिल देशमुख यांनी दिले. राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी गृहमंत्र्यांची भेट घेऊन नागरिकांवर होत असलेली कारवाई मागे घेण्याची विनंती करणारे निवेदन दिले. रस्त्यावर दिसलेल्या नागरिकांना पोलीसांनी समज देऊन त्यांची नावे लिहून घेतली होती. त्यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम 188 नुसार कारवाईच्या नोटीसा पाठविण्यात येत आहे. यातील अनेक नागरिक काही निकडीच्या कामासाठीही घराबाहेर पडले होते. त्या काळात असलेल्या कामाच्या ताणामुळे पोलीसांनी केवळ नावे लिहून घेतली. आता त्यांना नोटीसा येत असल्यामुळे कायदेशीर कारवाईची भीती निर्माण झाली आहे.


संबंधित बातम्या :



संचारबंदी मोडणाऱ्यांना लक्षात राहणारी शिक्षा सुनावली, 1 हजार रूपयांचा दंड, दिवसभर कोर्टात बसवलं!