Conjunctivitis Pune :  पुणे जिल्ह्यात डोळ्यांच्या (Conjunctivitis) साथीने डोकं वर काढलं आहे.  (Pink Eye) त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुणेकरांना डोळ्यांची चांगलीच (Infection) काळजी घ्यावी लागणार आहे. एकाच दिवशी म्हणजेच काल (2 ऑगस्ट)  1,090 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. पुणे आणि ग्रामीण भागात ही साथ पसरली आहे. पुण्यातील ग्रामीण भागात एकूण रुग्णांची संख्या 9,098 वर पोहोचली (Eye Infection) आहे. तर पुणे जिल्ह्यात (Pune district) आतापर्यंत एकूण 13,998 रुग्णांची नोंद झाली आहे. 


पुणे महानगरपालिका (Pmc) परिसरातील1,052 प्रकरणे, पिंपरी चिंचवडमधील (pimpri chinchwad) 3,047 आणि पुणे ग्रामीणमधील 9,898 प्रकरणे समाविष्ट आहेत. यापैकी एकूण 8,517 रुग्ण  आधीच बरे झाले आहेत. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवताना आणि पालकांनीदेखील कामाच्या ठिकाणी काळजी घेण्याचं आवाहन पुणे प्रशासनाने केले आहे.


डोळे येण्याची लक्षणे-


1. डोळे लाल होणे.
2. वारंवार पाणी गळणे.
3. डोळ्यांना सूज येणे.
4. काही वेळा डोळ्यातून चिकट द्रवपदार्थ बाहेरील बाजूस येतो.
5. डोळ्याला खाज येते.
6. डोळे जड वाटतात आणि डोळ्यात काहीतरी गेल्यासारखे वाटते.


डोळे आल्यास अशी काळजी घ्या


1. डोळ्याला स्वच्छ पाण्याने सतत धुणे.
2. इतर व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे इत्यादीने डोळे पुसू नये.
3. डोळ्यांना सतत स्पर्श करु नये.
4. घराबाहेर जाताना गॉगल वापरा.
5. संसर्ग झाल्याचे लक्षात येताच नेत्रतज्ञाचा सल्ला घ्यावा.
6. आपल्या सभोवतालाचा परीसर स्वच्छ ठेवावा.
7. शाळा, वसतीगृहे, अनाथालय अशा संस्थात्मक ठिकाणी जर अशी साथ आली असेल तर डोळे आलेल्या मुलाला किंवा व्यक्तीला वेगळे ठेवण्याची गरज आहे.
8. डोळे येणे हा संसर्गजन्य रोग असल्यामुळे एकापासून दुसऱ्या व्यक्तीला वेगाने संसर्ग होतो, त्यामुळे नियमीत हात धुवावा.
9. डॉक्टाराच्या सल्यानुसारच औषधं डोळ्यात टाकावी.


स्टेरॉईडचा वापर टाळा...


संसर्ग किंवा ऍलर्जीमुळे डोळे लाल होणे आणि सूज येणे यावर उपचार करण्यासाठी स्टेरॉईड याचा वापर केला जातो. शरीरात जळजळ करणारे पदार्थ बाहेर पडण्यास प्रतिबंध करून ते लालसरपणा, खाज सुटणे यासह वेदना कमी करण्यासाठी याचा वापर केला जातो. तर डोळ्यांच्या आजारासाठी अनेकजण याचा वापर करतात. मात्र, नागरिकांनी स्टेरॉईडचा वापर करू नयेत असे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे. कारण दीर्घकाळ वापरल्याने याचे डोळ्यावर परिणाम होण्याची शक्यता असते. 


 


हेही वाचा-


Eye Flu : डोळ्यांच्या साथीनं चिंता वाढवली! संसर्ग टाळण्यासाठी करा 'हे' 5 घरगुती उपाय