पुणे: राज्यात सध्या अनेक एटीएममध्ये खडखडाट आहे. याचाच निषेध करण्यासाठी पुण्यात काँग्रेसनं आंदोलन केलं.


पुण्यातल्या विश्रामबाग वाड्यासमोरील स्टेट बँक ऑफ इंडिया बँकेच्या एटीएमसमोर आंदोलन करण्यात आलं. नोटाबंदीनंतर आता पुन्हा एकदा पैशांची चणचण निर्माण झाली आहे.

एटीएममध्ये पैसे नसल्यानं नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुऴं त्वरित एटीएममध्ये पैशांचा पुरवठा करण्याची मागणी होते आहे.

नोटबंदीनंतर काही महिन्यानं हळूहळू परिस्थिती सामान्य झाली होती. लोकांना पैस उपलब्ध होऊ होत होते. मात्र, अचानक पुन्हा एकदा नोटांचा तुटवडा भासू लागला आहे. सरकार किंवा रिझर्व्ह बँकेकडून त्याबाबत कोणतं स्पष्टीकरणही देण्यात येत नसल्याने नागरिकांमध्ये बराच संभ्रम निर्माण झाला आहे.