पुणे : पुणे महापालिका निवडणुकीत अखेर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीवर शिक्कामोर्तब झालंय. काल अजित पवारांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत आघाडीवर निर्णय घेण्यात आला. महापालिकेतील 100 जागांवर ही आघाडी असेल, तर उरलेल्या 64 जागांवर मैत्रीपूर्ण लढत होणार असल्याचंही अजित पवारांनी स्पष्ट केलं.


पुण्यात गेल्या काही दिवसांपासून आघाडीमध्ये जागा वाटपांवरुन एकमत होत नव्हतं. तसंच पुण्यात युतीपाठोपाठ आघाडी तुटल्याचंही सांगितलं जात होतं. मात्र या सर्व गोष्टींना काल पूर्णविराम मिळाला आहे. महापालिकेत एकूण 164 जागांपैकी 100 जागांवर काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आघाडी होणार आहे, तर 64 जागांवर एकमत न झाल्यानं मैत्रीपूर्ण लढत होणार आहे. तसंच पिंपरी चिंचवडमध्ये आघाडीचा पुनर्विचार सुरु असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं.

दरम्यान पुणे महापालिकेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं यादी जाहीर न करताच उमेदवारांना अर्ज दाखल करण्यास सांगितलं आहे. एकमत झालेल्या 100 जागांवरील उमेदवारांना थेट एबी फॉर्म देण्यात येणार आहे.

संबंधित बातम्या

भाजप-शिवसेनेच्या पराभवासाठी काँग्रेस-राष्ट्रावादीनं एकत्र यावं: अजित पवार

'मातोश्री'चा जीव फक्त मुंबईमध्येच अडकलेला: अजित पवार