मद्यधुंद तरुणींचा पोलिस स्टेशनमध्ये धिंगाणा, पोलिसांना अरेरावी
एबीपी माझा वेब टीम | 30 Aug 2018 04:04 PM (IST)
नृत्य कलाकार असलेल्या या दोन तरुणी त्यांच्या एका मित्रासह आहेर गार्डन चौकात नंबरप्लेट नसलेल्या गाडीतून फिरत होत्या.
पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवडच्या मद्यधुंद तरुणींनी पोलिस स्टेशनमध्ये राडा घातला. चिंचवड पोलिस स्टेशनमध्ये मध्यरात्री एक वाजता तरुणींचा धिंगाणा सुरु होता. पोलिसांनी या प्रकरणी दोन तरुणींसह त्यांच्या एका मित्रावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. नृत्य कलाकार असलेल्या या दोन तरुणी त्यांच्या एका मित्रासह आहेर गार्डन चौकात नंबरप्लेट नसलेल्या गाडीतून फिरत होत्या. यामुळे पोलिसांनी हटकलं असता तरुणींचा मद्याविष्कार पाहायला मिळाला. आम्हाला जाब विचारणारे तुम्ही कोण असा प्रश्न तरुणींनी पोलिसांनाच विचारला. यानंतर पोलिसांनी तरुणींना पोलिस स्टेशनमध्ये आणलं. मात्र दारुची झिंग डोक्यात असल्याने तरुणींनी पोलिसांना आम्ही दारु पिणारच, आमच्या पैशाने पितो असं उर्मट उत्तर देत अरेरावी केली. इतकंच नाही तर तुम्हाला बांबू लावतो, म्हणत त्यांनी पोलिसांना धमकीही दिली. पाहा व्हिडीओ