पिंपरी-चिंचवड : अण्णा... हाक मारणारा कोंबडा, तात्या... अशी आरोळी ठोकणारा कोंबडा आणि त्यानंतर चार पायाची कोंबडी आपण पाहिली. आता आणखी एक लाडका कोंबडा चर्चेत आला आहे. पुण्यात एका कुटुंबाने चक्क आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे.
पुण्याच्या खेडमध्ये कोंबड्यावर जीवापाड प्रेम करणारं सोनावणे आहे. सोनावणे कुटुंबियांनी आपल्या लाडक्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे. दोन वर्षापूर्वी मुलगा ऋतूराज सोनावणे याला गणपतीच्या प्राणप्रतिष्ठेच्या दिवशी हा कोंबडा रस्त्यावर सापडला होता. सोनावणे कुटुंबियांनी आवडीने या कोंबड्याचं नाव 'पिल्लू' असं ठेवलं.
दोन वर्षापूर्वी गणपतीची प्राणप्रतिष्ठा झालेली असताना मुलाग ऋतूराजने घरी कोंबडा आणल्याने घरचे त्याला ओरडले होते. मात्र मुलाच्या हट्टापायी या कोंबड्याला सोनावणे कुटुंबियांनी आपल्या घरातील सदस्य बनवलं. त्यानंतर सोनवणे कुटुंबियांना या कोंबड्याचा लळा लागला आणि त्यांनी पुढे त्याचं 'पिल्लू' असं नामकरण केलं.
आता 'पिल्लू'ला सोनवणे कुटुंबियांची भाषा समजू लागली आहे. सोनवणे कुटुंबियही 'पिल्लू'चा हट्ट पूर्ण करू लागले आहेत. म्हणूनच दोन वर्षापूर्वी ज्या दिवशी 'पिल्लू' सोनवणे कुटुंबियांचा सदस्य झाला, त्या दिवशी त्याचा वाढदिवस साजरा केला जातो. वाढदिवशी केक कापून 'पिल्लू'ला तो भरवला जातो. अशारितीने रस्त्यावर सापडलेल्या कोंबडीचं नशीब फळफळलं आहे.
पुण्यात चक्क कोंबड्याचं बर्थ-डे सेलिब्रेशन!
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
15 Sep 2018 10:35 AM (IST)
अण्णा... हाक मारणारा कोंबडा, तात्या... अशी आरोळी ठोकणारा कोंबडा आणि त्यानंतर चार पायाची कोंबडी आपण पाहिली. पुण्यात एका कुटुंबाने चक्क आपल्या कोंबड्याचा वाढदिवस साजरा केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -