बारामती : बारामतीतील एमआयडीसीजवळ एक थराराक प्रकार घडला. एक नाग मध्यरात्री फणा काढून एकाच्या पायावर उभा होता. झोपलेल्या या युवकाला थंड स्पर्श व त्याच्या फुस्करण्याच्या आवाजाने जाग आली आणि पायावर उभा असलेला नाग पाहून प्रचंड घाबरला. त्याचवेळी त्याच्या बाजूला झोपलेला त्याचा भाऊही जागा आला. दोघेही सुमारे दोन तास नाग तिथेच ठिय्या मांडून असल्याने दोन्ही भाऊ नागाच्या नजरकैदेतच राहिले. मात्र, काही वेळाने नागाला हुसकावण्यात यश आले. मात्र, जाताना नागाने डंख मारला, पण विषाचे अंश शरीरात उतरले नसल्याने युवाकाचा जीव वाचला.
काय घडलं?
राजू राठोड व त्याचा धाकटा भाऊ कृष्णा हे मजुरी कामासाठी चार वर्षांपूर्वी बारामतीत आले. मूळचे हे हैदराबाद येथील हे दोघेजण गवंड्याच्या हाताखाली मजुरीचे काम करतात. रोजचे काम करुन जेवण उरकून झाले की झोपी जातात. दुसऱ्या दिवशी पुन्हा कामाला असे त्यांचा दिनक्रम. पण रविवारी रात्री नेहमीप्रमाणे हे भाऊ त्यांच्या छोट्या पत्र्याच्या शेडच्या समोर झोपले होते. मध्यरात्री अचानक राजूला जाग आली पायाला थंड स्पर्श व फुस्करण्याच्या आवाजाने तो उठला. त्याने पाहिले की त्याच्या पायावर एक भला मोठा नाग फणा काढून बसला होता. त्याची बोलतीच बंद झाली.
आपण हाललो तर हा आपणास दंश करेल, या भीतीने तो तसाच स्तब्ध एक तास पडून राहिला. शेजारीच त्याचा धाकटा भाऊ झोपला होता. नाग एका तासाने त्याच्या भावाच्या बाजूला गेला. आपला भाऊ धोक्यात येईल म्हणून त्याने भावाला जागे करण्याचा प्रयत्न केला. पण जागे होताना हालला अन् नागाने त्याला त्याच्या पांघरुणावरूनच दंश केला.
कृष्णाला ही सर्व घटना समजली दोघे भयभीत झाले होते. मध्यरात्री आलेला हा नाग तब्बल दोन तास त्यांच्या पायावर फणा काढून उभा होता. हे दोघे काही काळ या नागाच्या नजरकैदेत होते. अखेर राजूने जीवाच्या आकांताने हाका मारायला सुरुवात केली. काहींनी मदत करण्याचे प्रयत्न केले. मात्र नाग त्यांच्या पायावरच असल्याने तेही हतबल झाले. अखेर तेथील एक कुत्रा भुंकत तिथे आला व तो नाग तेथून निघून गेला.
जाण्यापूर्वी त्याने कृष्णाला दंश केला होता. त्यामुळे तिथे सर्पमित्र बोलाविण्यात आले. कृष्णाला दवाखान्यात नेण्यात आले. नाग त्याला चावला होता पण अंगावर पांघरुण असल्याने त्या नागाचे विष कृष्णाच्या शरीरात उतरले नाही. डॉक्टरांनी दोन दिवस त्याच्यावर वैद्यकीय तपासण्या केल्या.
त्यांच्या राहण्याच्या ठिकाणी मोठी अडगळ आहे व ते दोघे रात्री बाहेर झोपले होते. या भागात पावसातून सरपटणाऱ्या जीवांचा वावर वाढतो.
फणा काढलेल्या नागासोबत दोन भावांचा दोन तास थरार
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
14 Jul 2017 12:30 PM (IST)
नागाने दोन भावांना दोन तास नजरकैदेत ठेवले. सुदैवाने कुत्रा आल्याने नाग तिथून निघून गेला. मात्र, जाताना एकाच्या पायावर दंश केला. बारामतीतील एमआयडीसीजवळ हा थराराक प्रकार घडला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -