पुण्यात नागानेच नागाला गिळलं!
एबीपी माझा वेब टीम | 20 Jul 2017 04:04 PM (IST)
एका शेतात निद्रावस्थेत पडलेला नाग सर्पमित्र रशीद शेख यांनी पकडला. मात्र त्याने काहीतरी गिळल्याचं दिसून आलं. जेव्हा नागानं ती वस्तू बाहेर काढली त्यावेळी सगळ्यांनाच धक्का बसला.
पुणे: पुण्याच्या मंचरमध्ये नागानेच नाग गिळल्याचा प्रकार समोर आला आहे. याचा व्हिडीओ देखील समोर आला आहे. एका शेतात निद्रावस्थेत पडलेला नाग सर्पमित्र रशीद शेख यांनी पकडला. मात्र त्याने काहीतरी गिळल्याचं दिसून आलं. नागाला जंगलात सोडण्याआधी रशीद यांनी नागाला गिळलेली वस्तू बाहेर काढण्यास भाग पाडले. जेव्हा नागानं ती वस्तू बाहेर काढली त्यावेळी सगळ्यांनाच धक्का बसला. कारण त्याच्या तोंडातून भला मोठा नागच बाहेर आला होता. कारण नागानं चक्क दुसऱ्याच नागाला गिळलं होतं.