मुंबई : राजकीय नेत्यांमध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत असतात, मात्र एकमेकांवर राजकीय हल्लाबोल करणारे हे नेते कधी व्यक्तिगत पातळीवर येऊन एकमेकांवर निशाणा साधतात. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या नेत्या विद्या चव्हाण (Vidya Chavan) आणि भाजप नेत्या चित्रा वाघ (Chitra wagh) यांच्यात चांगलीच जुंपल्याचं पाहायला मिळालं. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलेल्या आरोपावरुन हा वाद रंगला असून चित्रा वाघ यांनी शेअर केलेल्या फोटोवरुन आज विद्या चव्हाण यांनी पत्रकार परिषद घेत पलटवार केला. यावेळी, चित्रा वाघ ह्या आमच्यामुळेच मोठ्या झाल्याचं सांगत, त्यांनी माझ्या सुनेचा वापर करुन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केल्याचंही विद्या चव्हाण यांनी म्हटलं. त्यावर, लगेचच चित्रा वाघ यांनी पत्रकार परिषद घेत प्रत्युत्तर दिलंय. यावेळी, राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) आपणास कशारितीने बदनाम करण्याचा प्रयत्न झाला. 100 लोकांसोबत माझं नावं जोडल्याचा गंभीर आरोपही वाघ यांनी केला.
कालपासून चित्रा वाघचे कारनामे मी महाराष्ट्राला सांगणार आहे, असे म्हणत विद्या चव्हाण यांनी सनसनाटी पसरवण्याचा प्रयत्न केला. माझ्याबद्दल चांगलं काही विद्या चव्हाण बोलतील, याची मला अपेक्षाच नाही. यापूर्वीही त्यांनी वेगवेगळ्या बायकांना बसवून मी कशी वाईट आहे, हे सांगण्याचा प्रयत्न केलाय. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने तीन-चारवेळा असा प्रयत्न केलाय, असे चित्रा वाघ यांनी म्हटलं.
विद्या चव्हाण यांना हा विषय राजकीयच करायचा होता. पवारसाहेब व मोठ्या ताई ह्या तुमच्या गँगला आवरा. मला फरक पडत नाही, माझा आवाज कोणीही दाबू शकत नाही, हे कृपया नोट करुन घ्या. ज्याच्यामुळे तुमच्यासारखे तोंडावर पडतात असे कच्चे खेळाडू पाठवू नका. 20 वर्षे तुमच्या पक्षात होते, मी बापासारखंच प्रेम केलं, पण तुम्ही काय केलं?. तु्म्ही माझा परिवाराला गोत्यात आणायचा प्रयत्न केला, मी सगळं सहन केलं. आता, पुन्हा हिला उभं केलं. माझी बदनामी करुन झाली, माझी नावं 100 लोकांसोबत लावून झाली, वाट्टेल ते बोललं गेलं. 4-5 बायका सुप्रिया ताईंनी प्रेस घ्यायला बसवल्या होत्या, हे विसरलात का काय, असा सवालही चित्रा वाघ यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना विचारला. तसेच, तुमच्याकडे गौरी चव्हाण आल्या असत्या तर बाई म्हणून तुम्ही काय केलं असतं. बाई म्हणून मी मदत केली, संवेदना जागा होत्या म्हणून केली आणि हजारदा करेन, अशा शब्दात चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर जोरदार पलटवार केला आहे.
चित्रा वाघमध्ये काहीतरी क्वॉलिटी
त्या म्हणतात चित्रा वाघला मी मोठं केलं, पण मला पक्षाने संधी दिली, मी काम केलं. 20 वर्षात पायाची कातडे काढून पक्षाला दिली आहेत. जी जबाबदारी दिली ती पार पाडली, चित्रा वाघमध्ये काही तरी क्वॉलेटी होती म्हणून मला जबाबदारी दिली. आम्ही कधीही लाभाची परवा केली नाही, भाजपने आज कुठलं लाभाचं पद दिलंय, शेवटचं एक वर्ष मला दिलं, असे म्हणत चित्रा वाघ यांनी विद्या चव्हाण यांच्यावर पलटवार केला.
आम्ही पेन ड्राईव्ह
पेन ड्राइव्हची वाट आम्ही देशमुखांची बघत होतो. जे पुरावे आहेत ते सादर करा, अन्यथा 3 तासात आम्ही पेन ड्राईव्ह सादर करू. त्या पोरीला केलं मी गाईड काय करणार आहेत विद्या चव्हाण. हा जर अपराध असेल तर असे अपराध मी करत राहीन, असेही वाघ यांनी म्हटलं.