पाण्याच्या टाकीत पडून एक महिन्याच्या चिमुरड्याचा मृत्यू
एबीपी माझा वेब टीम | 05 Jul 2016 02:26 AM (IST)
पिंपरीः पाणी भरताना महिलेच्या हातातून सुटल्याने एक महिन्याच्या चिमुरड्याचा पाण्याच्या टाकीत पडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. पुण्यामधील खेड राजगुरुनगरमध्ये ही घटना घडली आहे. पूजा गुडे या आपल्या घरासमोरच्या सिमेंटच्या टाकीतून सोमवारी दुपारी पाणी भरत होत्या. यावेळी तोल गेल्याने हातात असलेला चिमुरडा पाण्याच्या टाकीत पडला. टाकीवरचा पत्रा काढून चिमुरड्याला वाचवण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.