पुणे : काँग्रेसचे नवनिर्वाचित राज्यसभा खासदार चंद्रकांत हांडोरे यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांना इशारा देतानाच वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना भावनिक साद घातली आहे. चंद्रकांत हंडोरे यांनी शरद पवार यांचेही कौतुक केले. ते म्हणाले की, पवार साहेबांनी प्रचंड धोका पत्करून मराठवाडा विद्यापीठाला आंबेडकरांचे नाव दिलं. मी आठवले यांना विनंती करतो त्यांनी आता सगळं सोडावं असा इशारा चंद्रकांत हांडोरे यांनी रामदास आठवले यांना दिला.
चंद्रकांत हांडोरेंची प्रकाश आंबेडकर यांना भावनिक साद
नाही, तर आंबेडकरवादी जनता हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, प्रकाश आंबेडकर यांनी महाविकास आघाडीकडून जागा वाटपावर दोन दिवसांमध्ये स्पष्टता द्यावी, असे पत्र दिल्यानंतर महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता पसरली आहे. या पार्श्वभूमीवर चंद्रकांत हांडोरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना भावनिक साद घालत सोबत येण्याचे आवाहन केलं आहे.
आता एकच कार्यक्रम 48 पैकी 48 जागा जिंकायच्या
ते म्हणाले की मी प्रकाश आंबेडकर यांना विनंती करतो तुमचा किमान समान कार्यक्रम काहीही असू दे, आता एकच कार्यक्रम 48 पैकी 48 जागा जिंकायच्या आणि हक्काने सांगायचे की हा आमचा किमान समान कार्यक्रम आहे आणि केंद्रात हक्काने सांगायचे की हे आमचे प्रश्न आहेत. आमची विनंती आंबेडकरांना आहे की त्यांनी सगळं बाजूला ठेवावे, किती जागा कोणाच्या वाटायला येतात ते सोडून द्या महाराष्ट्रातील सगळी दलित जनता आंबेडकरवादी जनता ही महाविकास आघाडीच्या मागे उभे राहिली पाहिजे असा आवाहन त्यांनी यावेळी केले.
काँग्रेस मुक्त भारत म्हणत होते आता भाजपयुक्त काँग्रेस
यावेळी बोलताना सुप्रिया सुळे यांनी सुद्धा मनोगत व्यक्त केले. मला तीनवेळा निवडून देण्यात काँग्रेसचे मोठे योगदान दिल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी राज्यसभेत जाणार असल्याने दुःख झाल्याचे त्या म्हणाल्या. त्या एक उत्कृष्ट संसदपटू आहेत. त्या लोकसभेत नसल्याची उणीव मला आणि भाजपच्या चांगल्या खासदारांना वाटेल, असेही त्या म्हणाल्या.
त्या पुढे म्हणाल्या की, काँग्रेस मुक्त भारत म्हणत होते आता भाजपयुक्त काँग्रेस झाला आहे. आज सत्तेत आल्यावर सगळे बाहेरचे चेहरे दिसत आहेत. भाजपसाठी लाट्याकाठ्या खालेल्ल्या मूळ भाजप नेत्यांचं वाईट वाटतं. त्या म्हणाल्या की, भाजपने अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केले आणि आज ते त्यांच्यासोबत आहेत. आता भाजप भ्रष्टाचारी जुमला पार्टी झाली आहे अशी टीका त्यांनी केली. चव्हाणांवर भाजपने केलेल्या आरोप खरे होते की खोटे होते? जर खोटे असेल तर त्यांनी त्यांची माफी मागावी, असा टोलाही सुप्रिया सुळे यांनी लगावला.
त्याचबरोबर त्यांनी संजय राऊत आणि देशमुख यांचा अभिमान वाटतो अशीही प्रतिक्रिया दिली भाजप घर आणि पक्ष फोडत असताना आता विद्यार्थ्यांचे पेपर सुद्धा फोडत आहे, विद्यार्थ्यांकडे पुरावे आहेत, फडणवीसांनी चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी यावेळी केली. भाजपची देशात सत्ता आल्यावर निवडणूक होणार नाही, देशात दडपशाही सुरू आहे, आम्ही कोणालाही घाबरणार नसल्याचे त्या म्हणायला.
इतर महत्वाच्या बातम्या