Chagan Bhujbal on Atul Benke : माझा पुतण्या जेव्हा मला थांबायला सांगेल तेव्हा मी थांबणार, असं वक्तव्य करून मंत्री छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी थेट शरद पवारांना (sharad pawar) डिवचले. काका शरद पवारांना पुतण्या अजित पवारांना वारंवार थांबण्याचा सल्ला देत आहेत. मात्र ते थांबले नाहीत. हाच धागा धरून भुजबळांने उपरोधिक वक्तव्य केलं आहे.  मंत्री झाल्यानंतर छगन भुजबळ पहिल्यांदाच पुण्यात आले होते. 


पुण्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके ( Atul Benke)) यांची मनधरणी करण्यासाठी भुजबळ पोहचले होते. तेव्हा आता तुमचं वय झालंय असे अनेकजण म्हणतात, मग तुम्ही 2024 ची विधानसभा निवडणूक लढणार का? या प्रश्नाला उत्तर देताना भुजबळ म्हणाले, माझ्या पुतण्याने मला थांबायला सांगितलं तर मी नक्की थांबेन असं म्हणत पवारांना डिवचले. 


छगन भुजबळ म्हणाले की, अतुल बेनके आमचे जुने सहकारी आहेत. त्यांच्याविषयी आम्हाला कायमची आपुलकी वाटली आहे. आमच्या मनात शरद पवारांबाबत प्रचंड प्रेम आहे. येत्या निवडणुकांबाबत सगळ्यांना एकत्र करुन निवडणूक लढूया, असं अजित पवारांना वाटत आहे. अतुल बेनके हे राजकाणात काही नवीन नाहीत आणि रोहित पवारांएवढे लहानही नाही. विकासाच्या आणि कामाच्या दृष्टीने आपण काय करालयाल हवं, हे त्यांना चांगलं कळतं. त्यामुळे ते जरी शरद पवारांसोबत गेले असले तरीही काही दिवसांत ते त्यांचा अंतिम निर्णय घेतील. शपथविधीच्या वेळी अतुल बेनके दिवसभर आमच्या सोबत होते. सगळा सोहळा सुरु असताना बेनके पहिल्याच रांगेत बसले होते. राजकारणाच्या बाबतीत त्यांना चांगलीच समज आहे.   


2004 साली जुन्नर लढवा; शरद पवारांचा आग्रह


2004 साली जुन्नरची जागा लढवण्यासाठी पवारांनी मला विचारणा करण्यात आली होती. कारण आमच्या वडिलांची ही जन्मभूमी आहे. जुन्नरच्या संस्थेचा 40 वर्ष मी अध्यक्ष आहे. त्यामुळे जुन्नरमध्ये माझा संपर्क जास्त आहे हे पवारांना माहित होतं. त्यामुळे त्यांना मी जुन्नरमधून लढावं असं वाटतं होतं, असं सांगत त्यांनी पवारांसोबतची आठवण सांगितली. 


बेनके समजूतदार आहेत...



अतुल बेनके शपथ विधीच्या दिवशी अजित पवारांबरोबर होते. मात्र त्यानंतर त्यांनी थेट शरद पवारांना पाठिंबा दिला होता. बेनके शरद पवारांसोबत तटस्थ राहिलेत आणि  2024ची विधानसभा लढणार नाही, असं ही त्यांनी जाहीर केलं. त्यानंतर त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न छगन भुजबळ यांनी केला आहे. बेनके समजूतदार आहेत, असंही ते म्हणाले. 


Rohit Pawar Politics : पवार कुटुंबात भाजपने भांडणं लावली, आम्ही भांडत बसलो अन् भाजप मजा बघतंय; रोहित पवारांचं मोठं वक्तव्य