Rohit Pawar Politics : अजित पवारांनी केलेल्या बंडामुळे मागील काही दिवसांपासून राजकीय वाचावरण चांगलच तापलं आहे. एकमेकांवर दावे प्रतिदावे केले जात आहे. त्यातच आमदार रोहित पवार यांनी भाजप आणि अजित पवारांनी केलेल्या बंडावर मोठं वक्तव्य केलं आहे. पवार कुटुंबात भाजपने भांडणं लावली आहे. मागील काही दिवस राष्ट्रवादीतील फुटीमुळे आम्ही भांडत बसलो आहोत आणि भाजप या सगळ्याची मजा बघत बसलं आहे, असं वक्तव्य रोहित पवार यांनी राष्ट्रवादीतील फुटीसंदर्भात केलं आहे. ते पुण्यातील पत्रकार परिषदेत बोलत होते. 



 रोहित पवार म्हणाले की, भाजपने राजकारणात मागील काही दिवस झाले योग्य पद्धतीने डाव खेळला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी मराठी अस्मिता जपण्यासाठी शिवसेना काढली होती. मात्र भाजपने शिवसेना पक्ष फोडला. त्यामुळे भाजपविरोधात राज्यासह देशात  वातावरण निर्माण झालं आहे. या विरोधावर कोणी वक्तव्य करु नये आणि अनेक नेते आपल्यातल्या आपल्यात गुंतून राहावं यासाठी आता त्यांनी राष्ट्रवादीतदेखील फुट पाडली. याच सगळ्या राजकारणातील वातावरणामुळे उत्तर प्रत्युत्तर आमच्यातल्या आमच्यातच दिले जात आहे आणि भाजप बाजूला राहून मजा बघत बसलं आहे. 


अनेक गोष्टींवर बोलायला वय कमी पडतं...


सध्या पक्षात पडलेल्या फुटीमुळे मी अनेकांवर टीका करत आहे मात्र या टीका करत असताना काही बोलायचं राहून जातं आणि अनेक गोष्टींवर बोलायला माझं वय कमी पडतं म्हणून मी बोलू शकत नाही. मात्र यासगळ्यात अजित पवारांना व्हिलन बनवलं जात आहे. अजित पवारांचा निर्णय जनतेला पटलेला नाही. मात्र जनतेला सत्य माहिती आहे. पक्षात फूट कोणी पाडली आणि राजकारण वेगळ्या स्तरावर कोणी नेलं हे जनता कधीही विसरणार नसल्याची भूमिका रोहित पवारांनी स्पष्ट केली आहे. 


मी आजोबांबरोबर...


मी आजोबांबरोबर राहण्याची, पक्षाबरोबर राहण्याची आणि जनता कार्यकर्त्यांबरोबर राहण्याची भूमिका घेतली आहे. मात्र या सगळ्यामुळे एखादं कुटुंब फुटणं हे योग्य आहे का?, असा प्रश्न प्रत्येक महाराष्ट्रातील जनतेला पडला आहे. मात्र आपल्या कुटुंबावर अशी परिस्थिती येईल त्यावेळी आपण कोणती भूमिका घेणार?, असा प्रश्नची विचारला जात आहे. महाराष्ट्रातील तमाम जनता राजकारणात सुरु असलेल्या प्रत्येक घटनेला व्यक्तीगत घेत असल्याचं ते म्हणाले.


पवारांचा विचार घेऊन आम्ही पुढे जाणार...


अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांनी काही वर्षांपूर्वी भाजपविरोधात अनेकदा मोठी भाषणं केली आणि विरोधात भूमिकादेखील घेतल्या आहेत. मात्र आम्ही पवारांचा विचार घेऊन पुढे जाणार आहोत, असंदेखील ते म्हणाले. 


 


पक्षाचं नाव अन् चिन्हाबाबतच्या निवडणूक आयोगासंबंधित बातमी-च्या निर्णयाविरोधात ठाकरे सर्वोच्च न्यायालयात, 31 जुलैला सुनावणी