ब्राह्मणांचा अॅट्रॉसिटीमध्ये समावेश करा, ब्राह्मण महासंघाची मागणी
एबीपी माझा वेब टीम | 26 Oct 2016 07:38 AM (IST)
पुणे : ब्राह्मणांचा अॅट्रॉसिटीमध्ये समावेश करावा, अशी मागणी ब्राह्मण समाजाकडून करण्यात आली आहे. ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते रविकिरण साने यांनी एका मेळाव्यात याबाबत मागणी केली. पिंपरी चिंचवडमध्ये अखिल भारतीय ब्राहमण महासंघाच्यावतीने एका विशेष मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं. या मेळाव्यात ब्राह्मण समाजाने ही मोर्चा काढण्याची गरज व्यक्त करण्यात आली. अॅट्रॉसिटी कायद्यात बदल करण्याऐवजी ब्राह्मणांचाही त्यात समावेश करण्यात यावा, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे प्रवक्ते रविकिरण साने यांनी यावेळी केली. या मेळाव्याला ब्राह्मण चळवळीचे प्रणेते ह. मो. मराठे हे देखील उपस्थित होते.