Sudhir Mungantiwar : कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा आहे. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा. अशा घटनांना राजकीय स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले. ते आज बारामतीमधील माळेगाव येथील बोलते होते. यावेळी त्यांनी विविध विषयावर भाष्य केलं.
मोदीजी जेव्हा बारामतीत आले, तेव्हा एखादे उत्तम काम असेल, तर त्याची कौतुक करण्याची महाराष्ट्रात परंपरा आहे. मी सुद्धा एखादे चांगले काम करतो, तेव्हा हे जे विरोधक आहेत, तेही कौतुक करत होते. ही महाराष्ट्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे, ती खंडित होता कामा नये. हे खरे आहे की, चुकीच्या बाजूचे कोणीही समर्थन करू नये . जी बाजू चुकीची आहे, ज्यामध्ये अन्याय अत्याचाराचा भाव आहे त्याचे समर्थन देखील करता कामा नये. मात्र एखाद्या पक्षात जर एखादे चांगले असेल तर त्याचे समर्थनही करण्यास मागे पुढे पाहू नये, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
विधान परिषद शिक्षक मतदार संघ पराभवावर काय म्हणाले मुनगंटीवार ?
भाजपचे नेहमीच मंथन चालू असते. हे विजय झाला तर माजायचे नाही आणि पराभव झाला तर लाजायचे नाही अशा भूमिकेतून भाजप चालते. आम्ही इतके वर्ष सत्तेच्या बाहेर होतो, मात्र जनतेचा आवाज बुलंद करत होतो. संसदीय आयुधांचा वापर करत होतो. शेवटी आम्हाला जी शिकवणूक आहे ती, सत्तेसाठी काहीपण; असे नाही तर सत्यासाठी काही पण अशी आहे. आम्ही निवडणूक जिंकलो की हरलो याच्यापुरतं आमचं काम चालत नाही. आमचे लक्ष हे देशातील गरिबांच्या आयुष्यातील अंधार बाजूला करण्याचे आहे. चार निवडणुका हरल्या म्हणजे काहीतरी गडबड झाली, असे समजायचे कारण नाही. ठीक आहे आमचा पराभव झाला. आम्ही त्याचे समर्थन नक्की करू आणि भविष्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही उभारी घेऊ, असे मंत्री मुनगंटीवार
बाळासाहेब थोरात यांच्या राजीनामान्यावरही बोलले, म्हणाले....
काँग्रेसच्या अंतर्गत बाबीमध्ये मी का लक्ष घालू ? मात्र त्या पक्षाचेही एकमेकांचे पाय ओढण्याची परंपरा आहे. भाजपची जवळक असल्याचे वाटत नाही, त्यांच्या पक्षामध्ये ही मोठी परंपरा आहे. एकमेकांचे पाय ओढण्याची त्या परंपरेचे जे जे पाईक आहेत ते ते पुढे जातील. त्याच्यासाठी आम्ही काय बोलायची कारण नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
कृषी विज्ञान केंद्राची पाहणी -
भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी केली. मुनगंटीवार यांनी कृषी विज्ञान केंद्रासह कृषी महाविद्यालय आणि डेअरी ऑफ एक्सलन्सची देखील मुनगंटीवार यांनी पाहणी केली. बारामतीमध्ये होणारे कृषी प्रदर्शन हे मुनगंटीार यांना घ्यायचे आहे. म्हणून बारामतीतील कृषी विज्ञान केंद्राची पाहणी करण्यासाठी ते बारामतीत आले होते. त्यावेळी मुनगंटीवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. ज्यावेळी बारामतीतून निघत होते त्यावेळी त्यांना बारामती चांगली आहे का असं प्रश्न विचारला असता चंद्रपूर आमचं चांगला आहे, असा टोला देखील त्यांनी लगावला.
सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे -
चंद्रपूरमध्ये शेतकऱ्यांच्या हितासाठी प्रदर्शन भरावयचे आहे. या भागातील टेक्नॉलॉजीचा वापर तिकडे कसा करता येईल याचा विचार सुरू आहे. अमेरिकेत भरड धान्याचे उत्पन्न जास्त आहे. पंजाब सरकारने लाईट फुकट दिली होती आणि कालांतरानं त्यांची आर्थव्यवस्था ढासळली. सूर्यप्रकाशावर लाईट निर्मिती केली पाहिजे, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले.
मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले ?
मंत्रिमंडळ विस्तार झालं नाही म्हणून राज्य थांबले का? निवडणुका झाल्या नाहीत म्हणून काम थांबली का? 20 मंत्र्यांनी अनेक निर्णय घेतला. आजपर्यंत निर्णय झाले नाही ते निर्णय या सरकारने घेतले आहेत, असे मुनगंटीवार म्हणाले. सत्ता संघर्षचा निकाल लागेल. मी कोणत्याही राजकीय पक्षाची नोंदणी केली नाही आणि राजकीय पक्षाची शकले होताना मी पाहिले नाहीये. जे नियमानुसार आहे ते होईल अशी आशा आहे, असेही ते म्हणाले.
अजित पवार आज म्हणत आहेत अधिवेशनाचा कालावधी वाढावा हे मी 2 वर्ष म्हणत होतो, तेच आता अजित पवार म्हणत आहेत. अधिवेशनाचा कालावधी वाढवून जनतेच्या हिताची कामे झाली पाहिजेत. तसं झालं तर 4 आठवडे घेऊ, असे मुनगंटीवार यांनी सांगितलं.
आदित्य ठाकरेंच्या ताफ्यावर झालेल्या हल्ल्यात काय म्हणाले?
कुणाच्याही गाडीवर हल्ला होता कामा नये. मग ते किरीट सोमय्या असो किंवा आदित्य ठाकरेंची असो. किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला करून रडीचा डाव कुणी केला? गाडीवर हल्ला करणारे कोण आहेत? हे बघितले पाहिजे.. जेव्हा आपण तत्त्वज्ञान सांगतो त्यावेळेस आपण आपल्यापासून सुरुवात करावी ही अपेक्षा. अशा घटना कुणी जाणून बुजून करतो का? यावर विचार करावा... अशा घटनांना राजकीय स्वरूप देणे योग्य नाही, असे मुनगंटीवार म्हणाले.