Abhijeet Bichukale : 'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) धमकीचा फोन आला असून त्याने निवडणूक आयोगाकडे (Election Commission) लेखी तक्रार दाखल केली आहे. कसबा विधानसभा मतदारसंघातून दाखल केलेला अर्ज मागे घेण्यासाठी धमकीचा फोन आल्याचा तक्रारीत उल्लेख करण्यात आला आहे. धमकीनंतर आता तात्काळ संरक्षण देण्याची मागणी बिचुकलेने निवडणूक आयोगाकडे केली आहे. 

Continues below advertisement

अभिजीत बिचुकलेने दाखल केलेल्या तक्रारीत काय लिहिलंय? (Abhijeet Bichukale written complaint with the Election Commission)

तक्रार दाखल करत अभिजीत बिचुकलेने लिहिलं आहे,"मी कसबा मतदार संघातून अपक्ष अर्ज दाखल केल्यानंतर मला विरोधकांकडून मी अर्ज मागे घ्यावा तसेच पुणे सोडून साताऱ्याला जावं आणि असं जर तुम्ही केलं नाही तर तुमचा खून करू अशी धमकी देण्यात आली आहे". 

अभिजीत बिचुकलेने धमकीनंतर जीवाला धोका असल्याने त्याला आणि त्याच्या कुटुंबियांना तात्काळ संरक्षण देण्याची मागणी केली आहे. तसेच धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल करुन त्याला ताब्यात घ्यावे. आचारसंहितेदरम्यान असा प्रकार घडणं ही गंभीर बाब आहे, असंही बिचुकले म्हणाला.  

Continues below advertisement

अभिजीत बिचुकले पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात

'बिग बॉस' फेम अभिजीत बिचुकलेने पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. बिचुकलेने कसबा विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अभिजित बिचुकलेने उमेदवारी अर्ज भरल्याने ही पोटनिवडणूक खूपच रंजक होणार असल्याचे म्हटले जात आहे. 

काल झाली होती बाचाबाची

अभिजित बिचुकले आणि लहुजी संघटनेचे कार्यकर्ते यांच्यात  मंगळवारी निवडणूक कार्यालयासमोर बाचाबाची झाली होती. अभिजित बिचकुले त्यांची पत्नी अलंकृता बिचुकले आणि लहुजी छावा संघटनेचे अध्यक्ष सचिन इंगळे हे लहुजी संघटनेचे उमेदवार अनिल हातगडे हे उमेदवारी अर्ज दाखल करायला गेले असता या दोघांमध्ये बाचाबाची झाली होती.  

अभिजीत बिचुकले कायम चर्चेत!

'बिग बॉस' (Bigg Boss) फेम अभिजीत बिचुकले (Abhijit Bichukale) नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत असतो. बिचुकलेने आजवर अनेक निवडणुका लढवल्या असून त्याला यश आलेलं नाही. बिचुकलेला मुख्यमंत्री होण्याची इच्छा आहे. अनेकदा त्याने याबद्दल भाष्य केलं आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत बिचुकले यांनी अपक्ष अर्ज दाखल करत अनामत रक्कम म्हणून 12 हजार 500 रुपयांची चिल्लर जमा केली होती. 

संबंधित बातम्या

Pune Bypoll Election: कसबा पोटनिवडणुकीत अभिजीत बिचुकलेची एन्ट्री, पत्नी अलंकृता भरणार अर्ज