पुणे : विधानपरिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्यासाठी अर्ज दाखल करण्यासाठी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात आज मोठी गर्दी उसळली होती. या मतदारसंघात मुख्य लढत ही भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच असली तरी इतर अनेक उमेदवारांनी या निवडणुकीतही आज अर्ज दाखल केले. भाजपने आपला उमेदवार जाहीर केलाय. मात्र, राष्ट्रवादीने अद्याप नाव जाहीर केलं नाही.
भारतीय जनता पक्षाने या मतदारसंघातून सांगलीच्या संग्राम देशमुख यांना उमेदवारी दिलीय तर राष्ट्रवादी काँग्रेसने अद्याप त्यांचा उमेदवार घोषित केलेला नाही. संग्राम देशमुख यांनी आज त्यांच्या निवडणूक अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि पुण्याचे खासदार गिरीश बापट उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने मात्र अजून त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला नाही. उद्या अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असून अखेरच्या दिवशीच राष्ट्रवादी काँग्रेसचा अर्ज दाखल होणार आहे.
पदवीधर अन् शिक्षक विधान परिषद निवडणुकीवरुन महाविकास आघाडीत बिघाडीची शक्यता
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक प्रताप माने यांनी आज त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल करताना राष्ट्रवादीची उमेदवारी आपल्यालाच मिळेल असा दावा केला आहे. माने यांनी अर्ज दाखल करताना त्यांच्यासोबत हसन मुश्रीफ यांचा मुलगा आणि कोल्हापूरचे राष्टवादीचे जिल्हाध्यक्षही उपस्थित होते. याव्यतिरिक्त जनता दलाकडून माजी आमदार शरद पाटील यांनीही त्यांचा निवडणूक अर्ज दाखल केला. याशिवाय मनसेकडून रुपाली पाटील यांनी तर संभाजी ब्रिगेडकडून श्रीमंत कोकाटे यांनीही त्यांचा उमेदवारी अर्ज दाखल केलाय.
पदवीधर निवडणुकीवरून महाविकासआघाडीत बिघाडी?12 तारखेला अर्ज भरण्याची शेवटची तारीख,अद्याप जागावाटप नाही