मुंबई : पदवीधर आणि शिक्षक विधान परिषद निवडणुकीवरून महाविकास आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता आहे. विधानपरिषदेच्या निवडणुका जाहीर होऊन अजूनही जागांचे वाटप ठरले नाही, 12 तारखेपर्यंत अर्ज भरण्याची शेवटची तारीख आहे. मात्र, महाविकास आघाडीत जागा वाटप नेमकं अडलं कुठं असा प्रश्न विचारला जात आहे.


अमरावती शिक्षक मतदार संघातील सद्य आमदार श्रीकांत देशपांडे यांना शिवसेनेकडून उमेदवारी अपेक्षा आहे. पण त्याला काँग्रेसचा विरोध आहे. स्थानिक काँग्रेसकडून ही जागा काँग्रेसच्या पारड्यात यावी म्हणून मागणी आहे.


पुणे शिक्षक मतदार काँग्रेसला हवा आहे. याआधी आघाडीमध्ये काँग्रेसकडे ही जागा होती. त्या जागेवर दत्तात्रेय सावंत हे आता सद्य आमदार आहेत. दत्तात्रेय सावंत यांचा पक्ष ठरत नाही की ते काँग्रेसकडून निवडणूक लढवणार की राष्ट्रवादीतून जागा लढवणार. हे ठरत नसताना पुणे शिक्षकांसाठी नुकतीच कोल्हापुरात काँग्रेसने बैठक घेतली. यात ईच्छुकांच्या मुलाखतीही घेण्यात आल्या आहेत.


पुणे पदवीधर राष्ट्रवादी लढणार आहे. औरंगाबाद आणि नागपूर पदवीधर बाबत महाविकास आघाडीत वाद नाही. नागपूर पदवीधर काँग्रेस लढवण्याची शक्यता आहे. तर औरंगाबाद पदवीधर सतीश चव्हाण राष्ट्रवादीकडून लढवणार आहेत. एकूणच महाविकास आघाडीत जागा वाटपाचे सूत्र अजून ठरलेले नाही.


Vidhan Parishad | विधानपरिषदेच्या 12 नावांचा प्रस्ताव राज्यपालांकडे! राज्यपाल प्रस्ताव स्वीकारणार?