पुणे : बारामतीतील रोजगार मेळाव्याची सध्या राज्यात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. या रोजगार मेळाव्याच्या पत्रिकेत चक्क राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवारांचं नाव वगळल्या गेलं आहे. साधारण शरद पवारांनी या मेळाव्यासाठी वेळ राखून ठेवल्याची माहिती होती. या मेळाव्याच्या दिवशी म्हणजेच 2 मार्च हा दिवस त्यांनी दौरे न ठेवता राखून ठेवला होता. मात्र त्याचंच नाव वगळण्यात आल्याने आता पुन्हा एकचा चर्चेला उधाण आलं आहे. यातच महत्वाची बाब म्हणजे खासदार सुप्रिया सुळे, खासदार अमोल कोल्हे आणि वंदना चव्हाण यांची कार्यक्रम पत्रिकेत नाव आहेत.
2015 च्या जीआर नंतर शरद पवार राज्यसभेचे मेंबर आहेत आणि वंदना त्यांचे नाव त्या पत्रिकेत आहे पण पवार साहेबांचा नाही असं दिसतंय त्याच्यामुळे मलाही आश्चर्य वाटलं की वंदना त्यांच्या नाव आहे आणि पवार साहेबांचं का नाव नाहीये? हे सगळं कशामुळे झाले उत्तर माझ्याकडे नाहीये. याचं उत्तर सरकारला विचारावं लागेल, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या. सगळ्या मोठ्या लोकांनी आणि दुरदृष्टी असणाऱ्या लोकांनी या विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेची स्थापना केली आणि तिथेच हा कार्यक्रम होतोय, याचा अभिमान वाटतो.
या कार्यक्रमाला जाणार?
नमो रोजगार मेळाव्याचा कार्यक्रम बारामतीत होत आहे. मला या कार्यक्रमाचं आमंत्रण आलं आहे. त्यामुळे या बारामतीची लोकप्रतिनिधी म्हणून मी या कार्यक्रमाला जाणार आहे. शिवाय मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं स्वागतही करणार असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाल्या. नमो रोजगार मेळावा, शासन आपल्या दारी कार्यक्रमातून राजकीय हेतू साध्य केले जात आहेत का? असं विचारल्यास सुप्रिया सुळे म्हणाल्या की शासन आपल्या दारी या कार्यक्रमाच्या माध्यमातून सरकारने कोट्यावधी पैसे खर्च केले आहेत. शेवटच्या मिनिटाला जरी बोलवलं असतं तरीही मी लोकांसाठी या रोजगार मेळाव्याला हजेरी लावली असती.
शरद पवार गटाकडून टीका
या नमो मेळाव्यासोबतच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे बारामती बस स्थानक आणि बऱ्हाणपूर येथील पोलीस उपमुख्यलयाचे उद्घाटन करणार आहेत. आजपर्यंत बारामतीत अजित पवार इमारती बांधायचे आणि उद्घाटन शरद पवार करायचं पण आता अजित पवार सत्तेत गेले आणि अजित पवारांनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांना बोलावलं आहे. तिन्ही पक्षाचे प्रमुख नेते बारामतीत येणार असल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांच्या मनात आनंदाचे वातावरण आहे. या कार्यक्रमावरून शरद पवार गटाने टीका केली आहे
इतर महत्वाची बातमी-