बारामती, पुणे : बारामती तालुक्यात कोयता हल्ल्याचे (Baramati Crime) प्रकार वाढतच आहेत. त्यातच आता बारामती तालुक्यातील मोरगाव येथून धक्कादायक घटना समोर आली आहे. महावितरणच्या  महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार (Koyta attack) करण्यात आले आहे. लाईट बिल जास्त येत आहे अशी तक्रार करून दखल न घेतल्याने वार केले आहे. रिंकू पिटे असं या महावितरणच्या  महिला टेक्निशियनचं नाव आहे. अभिजित पोतेने कोयत्याने वार केले आहेत. 


या कोयत्या हल्ल्यात रिंकू पिटे यांनी आपला जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र कोयता दिसल्याने त्या घाबरल्या आणि अभिजितने त्यांच्यावर सपासप वार केले. या घटनेत रिंकू पिटे यांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांना उपचारासाठी पुण्यातील रुग्णालयात पाठवण्यात आलं आहे. आरोपीवर गुन्हा दाखल करण्याच प्रक्रिया सुरु आहे. 


काही दिवसांपूर्वी अशीच घटना समोर आली होती.  कोयता, सत्तूराचे वार करीत कॉलेजमध्ये शिकणाऱ्या मुलाचा निर्घृण खून केला होता. कारखेल येथील विनोद भोसले या युवकाचा या घटनेत मृत्यू झाला होता. कॉलेजमधून घरी कारखेलला निघालेल्या युवकावर चार ते पाच जणांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात युवक चांगलाच गंभीर जखमी झाला. यात त्याचा मृत्यू झाला होता. उंडवडीच्या बसस्थानकावर उतरलेल्या विनोद यास कारखेलमधीलच चार ते पाच जणांनी कोयता आणि कुऱ्हाडीने अनामुष वार करून गंभीर जखमी केलं होती. ही घटना ताजी असताना महावितरणच्या  महिला टेक्निशियनवर कोयत्याने वार केल्याची घटना समोर आली आहे. 


टवाळखोरांना रोखण्याचं आव्हान 


पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून कोयता हल्ल्यांच्या घटनेत वाढ झाली आहे. पुण्यातील विविध परिसरात कोयता गॅंगने दहशत माजवली आहे. ही दहशत रोखण्याचे प्रयत्न पुणे पोलिसांकडून सातत्याने सुरु आहेत. मात्र तरीही प्रकार संपत नसल्याचं समोर येत आहे.  या टवाळ गुन्हेगारांना रोखण्यासाठी रोज नव्या शक्कल लढवत आहेत. अल्पवयीन गुन्हेगार असेल तर त्यांच्या पालकांवर गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचा इशारादेखील दिला आहे. या टवाळखोरांना रोखण्याचं  पोलिसांसमोर मोठं आव्हान आहे. 


इतर महत्वाची बातमी-


Manikrao Thakre : निवडणूक आयोगाचा‌ गळा भाजपच्या हाती; माणिकराव ठाकरेंची सरकारवर जहरी टीका

Ravsaheb Danve Property : रावसाहेब दानवे 42 कोटींचे धनी, एकही गाडी नाही, 18 लाखांचं पशूधन, पत्नीकडे 45 तोळे सोने, पोस्टात सर्वाधिक गुंतवणूक!


पुणे पोलिसांचा मुळशी पॅटर्न; कुख्यात गुंड नव्याचा सिनेस्टाईल थरार, पाठलाग करुन अटक