पुणे : पोलीस आणि गुन्हेगारांची नेहमीच चकमक होत असते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून गुन्हेगारी (Crime News) वाढत असलेल्या पुणे जिल्ह्यात पोलीस व गुन्हेगाराचा सिनेस्टाईल थरार पाहायला मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातील मुठा गावात पोलीस (Police) आणि गुन्हेगारात पाठलाग झाल्याची घटना घडली. त्यानंतर, अखेर नव्या उर्फ नवनाथ निलेश वाडकर (वय १८) या कुख्यात गुंडाला पोलिसांनी अटक केली. नवनाथ वाडकर हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर खंडणी, खुनाचा प्रयत्न याबाबतचे गुन्हे दाखल आहेत. गेल्या काही दिवसांपासून तो फरार होता. अखेर, पोलिसांनी नव्याला अटक केली आहे. 


नवनाथसाठी गेल्या अनेक दिवसांपासून पोलीस पथकं मागावर होती. नव्या वाडकर हा मुळशी तालुक्यातील मुठा परिसरात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर गुन्हे शाखेचे खंडणीविरोधी पथक त्याला पकडण्यासाठी गेले असता त्याने पळून जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केल्याने सिनेस्टाईल थरार मुळशीमध्ये पाहायला मिळाल्याची चर्चा तालुक्यात रंगली आहे. विशेष म्हणजे पोलीस पाठलाग सुरू असतानाच वाडकरने पोलिसांच्या दिशेने एक गोळी झाडली. त्यानंतर, पोलिसांनीही स्वसंरक्षणार्थ प्रत्युत्तरादाखल वाडकरच्या दिशेने तीन गोळ्या झाडल्या. या चकमकीच्या सहाय्याने त्याने पळून जाण्याच्या प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले


पुण्यातील २००७ मध्ये पर्वती भागात जनता वसाहतीत निलेश वाडकर आणि सनी चव्हाण उर्फ चॉकलेट सुन्या यांच्या गुन्हेगारी टोळ्या होत्या. कधीकाळी वाडकर हा सनी चव्हाणचा "एकदम खास" मानला जायचा. मात्र काही दिवसांनी त्यांच्यात खटके उडाले आणि वाडकरने स्वतःची टोळी तयार केली. काही वर्षांपूर्वी गोळीबार केल्याच्या प्रकरणात निलेश वाडकर याला अटक झाली होती. तुरुंगातून सुटून आल्यानंतर वाडकर याचा सनीने खून झाला. या गुन्ह्यात फरार असलेल्या सनी याला पोलिसांनी अटक केली. तेव्हापासून निलेश वाडकर याचा मुलगा असलेल्या नव्या उर्फ नवनाथ वाडकर याने जनता वसाहत परिसरात वर्चस्व निर्माण करण्यास सुरुवात केली होती. या गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या घटनांमधून स्थानिक गुंडगिरी वाढली होती. त्यामुळे, फरार असलेल्या नव्याला अटक करण्यात पोलिसांना अखेर यश आले. 


हेही वाचा


Bhandara Crime News : एका रात्रीत अज्ञात चोरट्यांनी फोडली चक्क दहा दुकानं; दोन संशयितांना अटक