बारामती, पुणे : बारामतीत साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची   (Pune Crime news) धक्कादायक घटना घडली आहे. गंभीर बाब (Pune rape) म्हणजे अल्पवयीन सोळा वर्षाच्या मुलाने साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केला आहे. बारामती तालुक्यातील मेडदमध्ये घटना ही घटना घडली. बलात्कार केलेल्या अल्पवयीन मुलाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे बारामती शहरात चांगलीच खळबळ उडाली आहे.


बारामतीपासून जवळच असलेल्या मेडद येथील शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय इमारतीचे बांधकाम करण्याकरीता परप्रांतीय मजूर आले आहेत. याच कुटुंबातील साडेतीन वर्षाच्या चिमुकलीवर येथे किराणा मालाचे दुकान असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाने खाऊचे आमिष दाखवून या मुलीवर अत्याचार केला आहे. काल दुपारी तीन वाजता ही घटना घडली असून माळेगाव ग्रामीण पोलिसांनी या संदर्भात या अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत.


या घटनेमुळे बारामती शहर चांगलंच हादरलं आहे. सोळा वर्षीय मुलाने बलात्कार केल्यानं सगळीकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. अल्पवयीन मुलाने बलात्कार केल्यानं पोलीस या प्रकरणाचा गंभीर तपास करत आहे. अल्पवयीन मुलाने असं का केलं? त्याला ही माहिती कुठून मिळाली? त्याच्या मनावर काही वेगळा परिणाम झाला आहे का? किंवा या प्रकारची वासना एवढ्या लहान वयात कशामुळे निर्माण झाली?, याचा पोलीस शोध घेत आहे. 


सोशल मीडियाचा परिणाम?


सध्या अनेक मुलं सोशल मीडिया आणि रिल्सच्या आहारी गेले आहेत. रिल्सवर अनेकदा कोणतेही व्हिडीओ दिसत असतात. हेच व्हिडीओ लहान मुलं बघतात. या व्हिडीओचा परिणाम लहान मुलांच्या मनावर आणि त्यांच्या मानसिकतेवर होताना दिसत आहे. त्यामुळे पालकांनी आपला मुलगा सोशल मीडियावर नेमकं काय बघतो?, याकडे लक्ष ठेवण्याची गरज आहे. 


बलात्काराच्या घटनेत वाढ


पुण्यात लैंगिक अत्याचार आणि बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे. रोज अनेक नवे प्रकरणं समोर य़ेत आहे. ही प्रकरणं रोखण्यासाठी शाळा आणि बाकी स्तरांवरुन अनेक योजना राबवल्या जात आहे. मात्र तरीही लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणं थांबत नसल्याचं समोर येत आहे. यासोबतच मुलींबरोबर महिलादेखील शहरात असुरक्षित असल्याचं मागील दिवसांमध्ये घटलेल्या काही घटनांवरुन स्पष्ट होत आहे. त्यामुळे पुण्यात सध्या महिलांच्या, मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.


इतर महत्वाची बातमी-


Udyanraje Bhosale: धिस इज फ्रॉम हार्ट, नॉट टुडे, टिल आय डाय! उदयनराजेंच्या शिवेंद्रराजेंना फाडफाड इंग्रजीत वाढदिवसाच्या शुभेच्छा