Baramati Crime News: पेशंटला तपासण्यासाठी दार लवकर न उघडल्यामुळे आय़ुर्वेदीक डॉक्टरला मारहाण केल्याचा घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी या गावात हा धक्कादायक प्रकार घडला आहे. मारहाण करणाऱ्या आरोपींविरोधात डॉ. युवराज गायकवाड यांनी  फिर्याद दिली होती. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. आनंदा संभाजी जगताप, विश्वजीत आनंदा जगताप,
 भूषण आनंदा जगताप, राजेंद्र शंकर जगताप, अशोक शंकर जगताप  अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या आरोपींची नावं आहेत. 


नेमकं काय घडलं?
घरात डॉक्टर जेवण करीत होते, पेशंटला तपासण्यासाठी लवकर दरवाजा उघडला नाही, म्हणून आय़ुर्वेदीक डॉक्टरला मारहाण केल्याचा घटना घडली आहे. बारामती तालुक्यातील सांगवी येथे डॉक्टरला मारहाण झाली आहे. माळेगाव पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी माळेगाव पोलिसांनी आनंदा संभाजी जगताप, विश्वजीत आनंदा जगताप, भूषण आनंदा जगताप, राजेंद्र शंकर जगताप, अशोक शंकर जगताप यांनी ही मारहाण केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, युवराज गायकवाड हे डॉक्टर असून त्यांचा सांगवी येथे साई क्लिनिक या नावाने दवाखाना असून तेथेच ते राहण्यास आहेत. 6 सप्टेंबर रोजी रात्री सव्वानऊच्या सुमारास घरामध्ये गायकवाड हे जेवण करीत होते. 


लवकर दरवाजा उघडला नाही म्हणून फोडली काच 
त्यावेळी त्यांच्या घराचा दरवाजा जोरजोरात वाजवून कोणीतरी खिडकीची काच फोडली. जेवण करीत असताना लवकर दरवाजा उघडला नाही म्हणून ही काच फोडली होती. अखेर डॉक्टरांनी दरवाजा उघडला तर घराबाहेर आनंद उर्फ अनिल जगताप, विश्वजीत जगताप, अशोक जगताप, भूषण जगताप यांनी गायकवाड यांना हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरवात केली. तेव्हा गायकवाड यांचा मुलगा विराज हा तेथे आला व वडीलांना का मारता असे विचारल्यानंतर त्याला सुध्दा वरील चौघांनी मारण्यास सुरवात केली. त्यावरून गायकवाड यांनी माळेगाव पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यावरून पोलिसांनी 4 जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास माळेगाव पोलीस करीत आहेत.


अमरावतीत देखील झाली होती डॉक्टरांना मारहाण
डॉ.पंजाबराव देशमुख रूग्णालयातील 4 नवजात बालकांच्या मृत्यूप्रकरणी मनसे कार्यकर्ते आणि बालकांच्या नातेवाईकांकडून डॉ. भूषण कट्टा यांना मारहाण करण्यात आली होती. डॉ. भूषण कट्टा हे बालकांच्या मृत्यू वेळी तिथेच ड्युटीवर होते आणि मुलांच्या मृत्यूला त्यांचा हलगर्जीपणाच जबाबदार आहे असा आरोप मृत बालकांच्या नातेवाईकांनी केला होता.