पुणे : देशाच्या सीमेवर शत्रुंशी दोन हात करणाऱ्या जवानाची मात्र त्याच्या गावानेच उपेक्षा केली आहे. पुणे जिल्ह्यातील मांडवगण फराटा येथील बाळू चौगुले या जवानाचं घरं गावातल्या गलिच्छ राजकारणामुळे जमीनदोस्त करण्यात आलं आहे.


बाळू चौगुले हे भारताच्या रायफल शूटींग संघाचे सदस्य आहेत. मात्र ग्रामपंचायतीने घर पाडल्याने गेल्या 10 दिवसांपासून चौगुले आणि त्यांच्या कुटुंबीयांवर गायीच्या गोठ्यात उघड्यावर राहण्याची वेळ आली आहे.

आश्चर्याची बाब म्हणजे ज्या जागेवर चौगुले यांचं घरं उभारलेलं ती जागा 2014 साली ग्रामपंचायतीनेच दिली होती. मात्र घर पाडल्याने बाळु चौगुलेंना तात्काळ ड्युटी सोडून घरी परतावं लागलं. मात्र सरपंचापासून आमदारांपर्यंत सर्वांना विनवण्या केल्या तरी त्यांच्या मदतीसाठी कोणी धावून आलं नाही.