मुंबई: पुण्यातील संभाजी उद्यानातील राम गणेश गडकरींचा पुतळा नितेश राणे यांच्या चिथावणीनंतरच हटवण्यात आल्याचं समोर येतं आहे. कारण गेल्या वर्षी 16 जानेवारीला पुणे जिल्ह्यातील तुळापूरला भाषण करताना नितेश राणेंनी पुतळा हटवण्याचं आव्हान मराठा तरुणांना दिलं होतं.

'गडकरींचा पुतळा हटवेल त्याचा जंगी सत्कार आणि 5 लाख रुपये मी घरी पाठवून देईन.' असं वक्तव्य त्यांनी जाहीर भाषणात केलं होतं. सध्या नितेश राणेंचा तो व्हिडिओ सोशल मीडियातून व्हायरल होत आहे.

दरम्यान, पुण्यातील संभाजी उद्यानातून राम गणेश गडकरींचा पुतळा हटवल्याप्रकरणी अटकेत असलेल्या चारही आरोपींची 2 दिवसांनी पोलीस कोठडी वाढवण्यात आली आहे. तर गडकरींचा पुतळा तोडण्यासाठी वापरलेली हत्यारं नदीपात्रातून जप्त करण्यात आली आहे.

पुन्हा असा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी संभाजी उद्यानात लावलेल्या तैलचित्राभोवती कापडी कुंपण बसवण्यात आलं आहे. तसेच तैलचित्राला 10 पोलिसांचं संरक्षण देण्यात आलं आहे.

VIDEO: