पुणे : पुण्यात भीषण अपघातांची मालिका सुरुच आहे. आता चांदणी चौकात कंटेनरने एसटी बस तसेच पादचाऱ्यांना दिलेल्या धडकेत एकाचा जागीच मृत्यू झाला. या अपघातामध्ये एक गंभीर जखमी झाला असून 6 ते 7 जण किरकोळ जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातग्रस्त वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत. यावेळी मोठी वाहतूक कोंडी झाली होती. 


दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू 


दुसरीकडे, पुण्यात काल (12 जून) मार्केट यार्ड पोलिस ठाणे हद्दीत गंगाधाम चौक, बिबवेवाडी फायरब्रिगेड समोर, कोंढवाकडून गंगाधाम चौकाकडे येणाऱ्या आई माता मंदिर रोडजवळ डंपरने दुचाकीस पाठीमागून धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील महिलेचा जागीच मृत्यू झाला. या घटनेत महिला गंभीर जखमी झाली. जखमी महिलेला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अपघातानंतर डंपर चालकास ताब्यात घेण्यात आलं आहे. 


भरधाव कारची महिलेला धडक


दुसरीकडे, भोसरी एमआयडीसी परिसरात स्वराज सोसायटीसमोर एका भरधाव कारने महिलेला उडवल्याची घटना घडली. त्यानंतर ती कार न थांबता भरधाव वेगात निघून गेली. या अपघाताची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. या अपघातात महिला हवेत उडून रस्त्यावर आदळली. हा अपघात जवळच असलेल्या सीसीटीव्हीत कैद झाला आहे. अपघातात त्या महिलेला जखमी करून संबंधित कारचालक कारसह पसार झाला. 


इतर महत्वाच्या बातम्या