Amit Shah Pune Visit : केंद्रीय सहकारमंत्री अमित शाह (Amit Shah) आज (6 ऑगस्ट) पुणे दौऱ्यावर येणार आहेत.  बहुराज्यीय सहकार संस्थांसाठी तयार करण्यात आलेल्या वेब पोर्टलचे उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. पिंपरी चिंचवडच्या रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृहात हा कार्यक्रम पार पडेल. त्याअनुषंगाने  प्रेक्षकगृह परिसरात छावणीचे स्वरूप आलं आहे. पुण्यातील पंचतारांकित हॉटेल ते पिंपरीतील रामकृष्ण मोरे प्रेक्षकगृह दरम्यान ताफ्याची रंगीत तालीमही काल पार पडली. 


पश्चिम महाराष्ट्रात सहकार क्षेत्राचं जाळं पसरलेलं आहे. त्यामुळं अमित शाहांनी या कार्यक्रमासाठी पुण्याची निवड केल्याचं बोललं जातं आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री या कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत. काल संध्याकाळी ते पुण्यातील जे डब्यू मेरिएट हॉटेलवर दाखल झाले. त्यानंतर आज सकाळी ते थेट चिंचवडच्या मोरे प्रेक्षकगृहात हजेरी लावणार आहे. 


शहरात जय्यत तयारी


त्यांच्या स्वागतासाठी पुण्यातील सेनापती बापट रोड ते ब्रेमेन चौकापर्यंत महायुतीच्या सरकारचे झेंडे लावण्यात आले आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि भाजपचे झेंडे अनेक ठिकाणी लावण्यात आले आहेत. त्यांच्या या कार्यक्रमासाठी पुणे पोलिसांकडून जय्यत तयारी करण्यात आली आहे. 


जाणून घ्या वाहतुकीतील बदल


महावीर चौक : महावीर चौकाकडून चिंचवडगावाकडे जाणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंदी करण्यात येत आहे. त्यामुळे पर्यायी मार्गावरून ही वाहने महावीर चौकाकडून खंडोबा माळ चौक येथून इच्छित स्थळी जातील.


दर्शन हॉल लिंक रोड : लिंकरोडकडून अहिंसा चौकाकडे येणाऱ्या सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात येतं आहे.


पर्यायी मार्ग: वाहने मोरया हॉस्पिटल चौकाकडून इच्छित स्थळी जातील.



रिव्हर व्ह्यू चौक: अहिंसा चौक बाजूकडे जाण्यास सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेश बंद करण्यात आली असून ही वाहने या चौकाकडून वाल्हेकरवाडी, बिजलीनगरमार्गे इच्छित स्थळी जातील.


हा सर्व बदल रविवारी (उद्या, ता. 6) सकाळी आठ ते दुपारी तीन पर्यंत असणार आहे असेही (traffic) पोलिस आयुक्त काकासाहेब डोळे यांनी स्पष्ट केले.


अमित शहा यांच्याकडून मंत्रिमंडळ मिळणार का?


अमित शहा यांचा हा दौरा शासकीय असला तरी त्याकडे राजकीय दृष्टिकोनातून बघितलं जात आहे. राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री त्यांच्यासोबत बराच काळ असणार आहेत. यादरम्यान त्यांच्यामध्ये कुठल्या कुठल्या विषयांवर चर्चा होते त्याबद्दल उत्सुकता आहे. महत्त्वाचं म्हणजे राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार रखडलेला आहे. विधिमंडळ अधिवेशनानंतर मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याची चर्चा होती. त्यामुळे आता अधिवेशन संपलं आहे. तेव्हा अमित शहा यांच्याकडून मंत्रिमंडळ मिळतो का? याकडे लक्ष लागून आहे. 


कार्यकर्त्यांना भेटण्याची शक्यता 



या दौऱ्यात त्यांनी बराच वेळ राखीव ठेवला आहे. त्यात ते कदाचित पुण्यात वेगवेगळ्या लोकांशी संपर्क साधण्याची किंवा भाजप नेत्यांशीदेखील संवाद साधण्याची शक्यता आहे. पुणे पोटनिवडणुकीचा पराभवानंतर भाजपने पुण्याकडे चांगलच लक्ष केंद्रीत केलं आहे. त्यामुळे अनेक नेते पुणे दोऱ्यावर येताना दिसतात. येत्या 2024 च्य़ा निवडणुकांसाठी भाजप पुण्यात सक्रिय झाल्याचं पाहायला मिळत आहे. मोदींच्या दौऱ्यानंतर त्यांनी लगेच आपला दौरा आखला आहे. त्यातच राज्यात सत्तानाट्यदेखील बघायला मिळालं. यंदा भाजपने अजित पवारांचीदेखील साथ घेतली आहे. पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादीचं वर्चस्व आहे. त्यात बारामती पवारांचा बालेकिल्ला मानला जातो. याच बालेकिल्ल्यात सत्ता स्थापन करण्यासाठी भाजप प्रयत्न करणार आहे. 


हेही वाचा-


Manipur Violence : मणिपूरचा राजकुमार महाराष्ट्राचा जावई, संगीताच्या माध्यमातून सुचवले मणिपूरच्या प्रश्नावर उत्तर